IMPIMP

Heart Attack Risk Factors | ‘या’ 3 वाईट सवयींकडे आजच फिरवा पाठ, अन्यथा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

by nagesh
Heart Attack Risk Factors | heart attack risk factors change these 3 bad habits weight control smoking physical inactivity

सरकारसत्ता ऑनलाइन –  Heart Attack Risk Factors | ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) हा देखील आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे झपाट्याने वाढत असलेल्या आजारांपैकी एक आहे. हृदयविकार ही सामान्यत: वृद्धत्वाची समस्या मानली जाते, मात्र गेल्या काही वर्षांत तरुण वर्गही या गंभीर आजाराला बळी पडत आहेत. गेल्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla), कन्नड चित्रपटांचा लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी गायक केके (Singer KK) हे देखील या आजारामुळे आपल्यामध्ये राहिले नाहीत. (Heart Attack Risk Factors)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हृदयविकाराचा झटका का येतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयाला होणारा रक्ताचा प्रवाह रोखला गेला की हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो. या प्रकारचा अडथळा सहसा रक्तवाहिन्यांमधील चरबी, कोलेस्टेरॉल (Fat, cholesterol) आणि इतर पदार्थांच्या वाढीमुळे होतो. जाणूनबुजून किंवा नकळत आपण दररोज अशा काही गोष्टी करत असतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, सर्व लोकांना याची माहिती असणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे. आपल्या सवयी सुधारून आपण हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी करू शकतो. (Heart Attack Risk Factors)

 

हृदयविकाराचा धोका वाढवणार्‍या सवयी

1. वजनावर नियंत्रण न ठेवणे
धावपळीच्या या जीवनात, बहुतेक लोक लठ्ठपणा (Obesity) किंवा जास्त वजनाच्या समस्येने त्रस्त असतात. हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीच्या घटकांपैकी हा एक घटक असल्याचे आरोग्य तज्ञ मानतात. मायोहेल्थ म्हणते की लठ्ठपणामुळे हाय ब्लड कोलेस्टेरॉल, हाय ट्रायग्लिसराइड, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटिजचा (High Bblood Cholesterol, High Triglyceride, High Blood Pressure, Diabetes) धोका वाढतो, या सर्वांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी वेळेत वजन कमी (weight loss) करा.

2. स्मोकिंग आणि टेन्शन (Smoking and stress)
अनेक अभ्यास असे सूचित करतात की जे लोक धूम्रपान करतात आणि जास्त तणावाखाली असतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. खरं तर, धूम्रपानामुळे धमन्यांमध्ये कालांतराने प्लेक तयार होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे जास्त ताण घेतल्याने रक्तदाबाचा त्रास वाढतो, जो हृदयविकाराचा मुख्य घटक मानला जातो. यामुळेच तणाव न घेण्याचा आणि धूम्रपानापासून दूर राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

3. फिजिकली इनअ‍ॅक्टिव्ह
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला आरामदायी जीवन आवडत असेल तर या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शारीरिक निष्क्रियतेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो यात शंका नाही. कारण जेव्हा शरीर निष्क्रिय राहते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी पदार्थ तयार होऊ लागतात. तुमच्या हृदयापर्यंत रक्त वाहून नेणार्‍या धमन्या खराब झाल्या किंवा ब्लॉक झाल्या तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामुळेच सर्व लोकांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योगासने आणि नियमित व्यायाम करून हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो.

हार्ट अटॅकची लक्षणे

1. छातीत वेदना वाढणे
2. घाम येणे
3. धाप लागणे
4. उलट्या, मळमळ
5. चक्कर येणे
6. अचानक थकवा
7. छातीच्या मध्यभागी काही मिनिटांसाठी तीव्र वेदना, जडपणा किंवा आकुंचन
8. वेदना हृदयापासून खांदा, मान, हात आणि जबड्यापर्यंत पसरते

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Heart Attack Risk Factors | heart attack risk factors change these 3 bad habits weight control smoking physical inactivity

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission Update | सरकारी कर्मचार्‍यांना मिळेल डबल भेट ? ऑगस्टमध्ये होऊ शकते मोठी घोषणा

BJP JP Nadda On Shivsena | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा; म्हणाले – ‘महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील’

Pune Pimpri Crime | कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करुन महिलेचा विनयभंग, आरोपी गजाआड

 

Related Posts