IMPIMP

Hurun Global 500 | जगातील 500 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये 12 भारतातील; रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव सर्वात वर

by bali123
Hurun Global 500 | Hurun Global 500 12 indian firm encluding in 500 most valuable companies reliance industries tops

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Hurun Global 500 | जगातील 500 सर्वात जास्त मूल्यवान खासगी कंपन्यांमध्ये भारताच्या 12 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव सर्वात वर आहे. 20 ऑगस्टला हुरुन रिसर्च इन्स्टीट्यूटने Hurun Global 500 च्या जारी केलेल्या यादीनुसार, रिलायन्सनंतर टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि एचडीएफसी बँक आहे.

या 12 भारतीय कंपन्यांनी मिळवले स्थान

जगातील सर्वात जास्त मूल्यवान कंपनी अ‍ॅप्पल आहे. यामध्ये त्या कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे ज्यांचा खासगी कंपन्यांमध्ये समावेश नाही. तर 2021 साठी हुरुन ग्लोबल 500 मध्ये 12 भारतीय कंपन्यांमध्ये यावेळी विप्रो लिमिटेड, एशियन पेन्ट्स लिमिटेड आणि एचसीएल टेक्नोलॉजीस लिमिटेडने स्थान मिळवले. तर आयटीसी लिमिटेड बाहेर पडली आहे.

रिलायन्स जगात 58 व्या स्थानावर

हुरुनच्या प्रमुख 500 कंपन्यांच्या यादीत भारतातून सर्वात वर रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव आहे.
रिलायन्सच्या व्हॅल्यूमध्ये यावर्षी 11 टक्केची वाढ झाली आहे
आणि तिला 18.8 हजार कोटी डॉलर (13.98 लाख कोटी रुपये) च्या भांडवलासह 57व्या स्थानावर ठेवले आहे.

यादीतून 48 कंपन्या बाहेर

टीसीएसचे भांडवल एक वर्षात 18 टक्के वाढून 16.4 हजार कोटी डॉलर (12.2 लाख कोटी रुपये) झाले. एचडीएफसी बँकेचे भांडवल 11.3 हजार कोटी डॉलर (8.40 लाख कोटी रुपये) झाले.
यावेळी टॉप 500 व्हॅल्यूएबल कंपन्यांच्या यादीतून 48 कंपन्या बाहेर गेल्या आहेत.
ज्यामध्ये आयटीसी सुद्धा आहे.

अ‍ॅप्पलची व्हॅल्यू 2.44 लाख कोटी डॉलर

आयटीसीला 2020 च्या यादीत 480व्या स्थानावर ठेवले होते.
अ‍ॅप्पलची व्हॅल्यू 2.44 लाख कोटी डॉलर, मायक्रोसॉफ्टची 2.11 लाख कोटी डॉलर,
अमेझॉनची 1.8 लाख कोटी डॉलर आणि अल्फाबेटची 1.7 लाख कोटी व्हॅल्यू ठरवण्यात आली.

मुंबईचे सर्वात जास्त प्रतिनिधित्व

यादीत 12 कंपन्यांसह भारत ऑस्ट्रेलियापेक्षा एक पायरी वर गेला आहे. यादीत भारत वर 9 व्या स्थानावर पोहचला आहे.
यादीत आठ शहर-आधारित कंपन्यांसह मुंबईचे सर्वात जास्त प्रतिनिधित्व होते.
यानंतर बेंगळुरूतून दोन नोएडा आणि नवी दिल्लीतून एक-एक होती.
आर्थिक सेवा आणि सॉफ्टवेयर आणि सेवांनी चार कंपन्यांसोबत नेतृत्व केले.
यानंतर हुरुन ग्लोबल 500 यादीत दोन भारतीय फर्मसह दूरसंचारचे स्थान होते.

अ‍ॅप्पल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, अल्फाबेट टॉप 4

यादीनुसार जगातील चार सर्वात मोठ्या कंपन्या अ‍ॅप्पल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि अल्फाबेटची व्हॅल्यू कोविड काळात दुप्पट झाली आहे.
या चार कंपन्यांचे एकुण मूल्य कोविड काळात 4 लाख कोटी डॉलर (297.61 लाख कोटी रुपये) ने वाढून 8 लाख कोटी डॉलर (595.22 लाख कोटी रुपये) झाले.

Web Title : Hurun Global 500 | Hurun Global 500 12 indian firm encluding in 500 most valuable companies reliance industries tops

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तरूणीची आत्महत्या, प्रियकराला अटक

Pune Crime | पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन, खराडी मुंढवा बायपास रोडवरील घटना 

Related Posts