IMPIMP

Income Tax Exemption | हेल्थ इन्श्युरन्सद्वारे ‘या’ 6 पद्धतींनी मिळवा इन्कम टॅक्सवर सूट

by bali123
Income Tax Exemption | get income tax exemption in these 6 ways through health insurance

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Exemption | हेल्थ इन्श्युरन्स (Health Insurance) असेल तर तुम्ही कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये सहज आपल्या प्रियजणांचा उपचार करू शकता. सोबतच अशाप्रकारच्या पॉलिसी घेतल्यास इन्कम टॅक्समध्ये सूटचा लाभ सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर या 6 पद्धतींनी हेल्थ इन्श्युरन्सद्वारे इन्कम टॅक्स वाचवू (Income Tax Exemption) शकता.

 

नियमित आरोग्य तपासणी

हेल्थ पॉलिसी असेल तर तुम्ही रेग्युलर होणार्‍या हेल्थ चेकअपच्या खर्चाच्या आधारावर, इन्कम टॅक्समध्ये वार्षिक 25,000 पर्यंत सूट मिळवू शकता. सेक्शन 80सी ऑफ इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट,1961 नुसार साठ वर्षापेक्षा कमी वयावर ही रक्कम 25,000 आहे तर 60+ झाल्यावर पॉलिसी होल्डरला इन्कम टॅक्सवर 30,000 पर्यंत लाभ मिळतो. याशिवाय तुम्ही दरवर्षी 5,000 पर्यंतचा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सुद्धा क्लेम करू शकता.

 

आई-वडिलांसाठी पॉलिसी घेतल्यास

सेक्शन 80D इन्कम टॅक्स अ‍ॅक्टनुसार, जर कुणी व्यक्ती आपल्या आई-वडिलांसाठी घेतलेल्या इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम जमा करत असेल तर तो इन्कम टॅक्सवर प्रतिवर्ष 50,000 रूपयांपर्यंत सूट मिळवू शकतो. यामध्ये इन्कम टॅक्सवर 50,000 रूपयांपर्यंत बचत करू शतका. (Income Tax Exemption)

 

रोख पेमेंटवर मिळत नाही लाभ –

जर तुम्ही इन्श्युरन्स पॉलिसीच्या प्रीमियमचा भरणा केवळ कॅशमध्ये करत असाल तर इन्कम टॅक्स वाचवण्याची संधी गमावत आहात. प्रीमियमचा भरणा डिमांड ड्राफ्ट, चेक, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे केल्यास इन्कम टॅक्स वाचवू शकता.

 

सेक्शन 80DDB चा लाभ

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी गंभीर आजारात उपचाराची सुविधा देते, तसेच इन्कम टॅक्समध्ये 60 वर्षापेक्षा कमी वयावर 40,000 आणि 60+ झाल्यावर 60,000 ते 80,000 पर्यंत सूटची सुविधा मिळते. 11DD नियमांतर्गत काही विशेष आजारांचा समावेश केला गेला आहे. कॅन्सर, कार्डियक फेल्यूअर किंवा कार्डियक अरेस्ट सारखे गंभीर रोगाने ग्रस्त झाल्यास इन्कम टॅक्सवर 40 ते 80 हजार रूपयांपर्यंत लाभ घेऊ शकता. हा लाभ घेण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना डॉक्टरांचे सर्टिफिकेट लावणे आवश्यक असते.

 

अपंग सदस्यांचा उपचार

कुटुंबातील एखादा सदस्य (पालक, पती/पत्नी, मुले) अपंग असल्यास आणि पूर्णपणे अवलंबून असल्यास, पॉलिसीधारकास कलम 80U अंतर्गत प्राप्तीकरावर 75,000 रुपयांपर्यंतची सूट मिळते. दिव्यांग व्यक्ती कोणत्याही गंभीर आजाराला बळी पडल्यास, प्राप्तीकरात सूट मिळण्याची रक्कम 1,25,000 पर्यंत असू शकते.

 

कॉर्पोरेट हेल्थ इन्श्युरन्स

तुमचा आणि तुमच्या कुटुंबावरील वैद्यकीय खर्च कार्यालयाने किंवा तुमच्या कंपनीने पगारातून दिला असेल,
तर तुम्ही वार्षिक 15,000 रुपयांपर्यंत इन्कम सूट मिळवू शकता.
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Reliance General Insurance) हे विश्वसनीय ठिकाण आहे.
येथे तुम्ही गरजेनुसार विमा योजना निवडू शकता.

 

रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Reliance General Insurance) तुम्हाला हेल्थ इन्फिनिटी इन्शुरन्स,
हेल्थ गेन पॉलिसी, हॉस्पी केअर इन्शुरन्स आणि सुपर टॉप-अप योजना यासारखे पर्याय ऑफर करते.
ज्यामध्ये तुम्हाला कॅशलेस उपचार, नियमित आरोग्य तपासणी, डे केअर, हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि पोस्ट कव्हर अशा अनेक सुविधा मिळतात.

 

येथे तुम्ही तुमच्या जुन्या पॉलिसीचे अगदी सहज ऑनलाइन नूतनीकरण करू शकता.
RGI कडून योजना घेऊन तुम्ही सवलती आणि ऑफर देखील मिळवू शकता.

 

Web Title :- Income Tax Exemption | get income tax exemption in these 6 ways through health insurance

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts