IMPIMP

India vs England | सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर भारताचा विजय नक्की! ‘हे’ आहे कारण

by nagesh
IND vs AUS | ind vs aus nagpur test team india playing 11 for 1st test match suryakumar yadav and ks bharat debut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये भारताचा इंग्लडबरोबर (India vs England) तर पाकिस्तानचा (Pakistan) न्यूझीलंड (New Zealand) बरोबर सामना होणार आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2022 चा दुसरा सेमीफायनलचा सामना गुरूवारी 10 नोव्हेंबरला ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे इंग्लंडपेक्षा जड असल्याने तो या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडवर पक्का विजय

टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध (India vs England) विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी20 च्या 22 मॅच झाल्या आहेत, यातल्या 12 सामन्यांमध्ये भारताचा तर 10 सामन्यांमध्ये इंग्लंडचा विजय झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 3 मॅच झाल्या आहेत. यामधील 2 मॅच भारताने आणि एक मॅच इंग्लंडने जिंकली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना 2012 साली झाला. 2007 सालच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही या दोन टीम आमने-सामने होत्या. या सामन्यात युवराज सिंगने (Yuvraj Singh) स्टुअर्ट ब्रॉडला (Stuart Broad) 6 बॉल 6 सिक्स मारत मोठा विक्रम केला होता.

 

आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ ठरली आहे.
मात्र यंदाच्या वर्ल्डकप आपल्याला अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.
त्यामुळे या क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही.
त्यामुळे इंडियाला या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करावा लागणार आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत आपला रेकॉर्ड कायम ठेवतो कि यंदा इंग्लंड भारतावर वरचढ ठरणार हे पाहणे
महत्वाचे ठरणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  India vs England | india will definately win against england in t20wc2022 sport news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वारजे माळवाडीत स्पाच्या नावावर वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेची ‘रेड’

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोध, प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर FIR

 

Related Posts