IMPIMP

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा सलग पाचवा विजय; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय !!

by nagesh
Indrani Balan Winter T 20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; MES Cricket Club's fifth win in a row; Hemant Patil Cricket Academy's second win in a row!!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ (Indrani Balan Winter T 20 League 2022) अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब संघाने सलग पाचवा तर, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अमेय श्रीखंडे याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा २७ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १७८ धावांचे आव्हान उभे केले. अमेय श्रीखंडे याने ६५ धावांची आणि सुधांशु गुंदेटी याने ५७ धावांची खेळी केली. तिसर्‍या गड्यासाठी संदीप शिंदे (३२ धावा) आणि सुधांशु या दोघांनी ४९ चेंडूत ७० धावांची भागिदारी करून डावाला आकार दिला. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने प्रतिउत्तरात १५१ धावा केल्या. विश्‍वजीत राजपुत याने ६७ धावांची खेळी केली.

 

Balan-Group-2-1.webp (750×430)

 

कर्णधार रोहीत हाडके याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेतील सलग पाचवा विजय नोंदविला. ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीला प्रथम फलंदाजी करताना १३८ धावा धावफलकावर लावता आल्या. आयुश श्रीवास्तव याने ५० धावांची खेळी केली. रोहीत हाडके याने २० धावात ४ गडी बाद करून ब्रेव्हहार्ट संघाच्या डावाला रोखले. एमईएस क्रिकेट क्लबने १२.५ षटकात व ३ गडी गमावून ही धावसंख्या पार केली. प्रतिक पोखरनिकर (६० धावा) आणि अजित गव्हाणे (४८ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ४८ चेंडूत ८८ धावांची भागिदारी रचून संघाचा विजय साकार केला. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

 

Balan-Group-3-1.webp (750×430)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद १७८ धावा (अमेय श्रीखंडे ६५ (३१, ७ चौकार, ४ षटकार),
सुधांशु गुंदेटी ५७ (४४, ११ चौकार), संदीप शिंदे ३२, अनिल थोरे २-२४);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी संदीप आणि
सुधांशु यांच्यात ७० (४९) वि.वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १५१ धावा
(विश्‍वजीत राजपुत ६७ (४९, १० चौकार, १ षटकार), अभिजीत भगत २६, हरी सावंत ४-२४); सामनावीरः अमेय श्रीखंडे;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १३८ धावा (आयुश श्रीवास्तव ५० (३५, ६ चौकार, ३ षटकार),
नेल्सन एरीक २९, रोहीत हाडके ४-२०, वैभव गोसावी २-२३) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः १२.५ षटकात
३ गडी बाद १४० धावा (प्रतिक पोखरनिकर ६० (३४, १२ चौकार), अजित गव्हाणे ४८ (२४, ८ चौकार, १ षटकार);
भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी प्रतिक आणि अजित ८८ (४८) सामनावीरः रोहीत हाडके;

 

Web Title :- Indrani Balan Winter T 20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; MES Cricket Club’s fifth win in a row; Hemant Patil Cricket Academy’s second win in a row!!

 

हे देखील वाचा :

Uday Samant | ‘जत तालुक्याच्या पाणीप्रश्नासोबतच शंभर हेक्टर जागेत एमआयडीसी उभारणार’ – उदय सामंत

Pune Crime | टपरीचालकावर धारदार हत्याराने वार; कोंढव्यातील घटना

Pimpri Chinchwad-PCMC News | कार्यशाळेस दांडी मारणे पीसीएमसीतील पदाधिकाऱ्यांना पडले महागात; थेट कारवाईचा इशारा

Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार

 

Related Posts