IMPIMP

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स, गेम चेंजर्स संघांची विजयी कामगिरी !!

by nagesh
Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance by Eon Warriors, Game Changers teams !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत इऑन वॉरीयर्स संघाने सलग पाचवा विजय मिळवला. द गेम चेंजर्स संघाने प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयाचा चौकार मारला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुरज शिंदे याच्या ९७ धावांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर द गेम चेंजर्स संघाने ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा २७ धावांनी पराभव करून चौथा विजय नोंदविला. द गेम चेंजर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०३ धावांचा डोंगर उभा केला. सुरज शिंदे याने ४६ चेंडूत ३ चौकार आणि ११ षटकारांसह ९७ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला अतुल विटकर (२८ धावा) आणि नौशाद शेख (२२ धावा) यांनी सुरेख साथ दिली. चौथ्या गड्यासाठी सुरज आणि अतुल यांनी ५० चेंडूत ८० धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १७६ धावांवर मर्यादित राहीला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

निहाल शेख याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इऑन वॉरीयर्स संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. निहाल शेख याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या समोर क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा डाव ९९ धावांवर रोखला गेला. निहाल याने १९ धावात ४ गडी टिपत पठाणस् संघाच्या डावाला खिंडार पाडले. इऑन वॉरीयर्स संघाने हे आव्हान ९.१ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. राजवर्धन उंड्रे (४७ धावा) आणि अभिमन्यु सिंग (२४ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

द गेम चेंजर्सः २० षटकात ५ गडी बाद २०३ धावा (सुरज शिंदे ९७ (४६, ३ चौकार, ११ षटकार),
अतुल विटकर २८, नौशाद शेख २२);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी सुरज आणि अतुल यांच्यात ८० (५०)
वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १७६ धावा (गिरीष कोंडे ६५ (३०, ५ चौकार, ६ षटकार),
वैभव लवांडे ३७, निकीत धुमाळ २-२३, हितेश वाळूंज २-३४); सामनावीरः सुरज शिंदे;

 

क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्ः १८.४ षटकात १० गडी बाद ९९ धावा (गणेश साळूंखे २१, मंदार मोरे ११,
निहाल शेख ४-१९, रेहान खान २-५) पराभूत वि. इऑन वॉरीयर्सः ९.१ षटकात १ गडी बाद १०२ धावा
(राजवर्धन उंड्रे ४७, अभिमन्यु सिंग २४, निशांत नगरकर २२); सामनावीरः निहाल शेख;

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Winning performance by Eon Warriors, Game Changers teams !!

 

हे देखील वाचा :

Mundhwa Premier League Cricket Tournament | ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Maharashtra Politics | ‘2013 आणि 2018 साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलवार

Pune Pimpri Chinchwad Crime | स्कोडा कारमधून पिस्टलची चोरी, निगडी परिसरातील घटना

 

Related Posts