IMPIMP

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

by nagesh
Intermittent Fasting | weight loss tips what is intermittent fast and it helps to reduce weight know everything about it

सरकारसत्ता ऑनलाइन – वजन त्वरित कमी करण्यासाठी (Weight Loss) बहुदा इंटरमिटंट फास्टिंगचा (Intermittent Fasting) आधार घेतला जाऊ शकतो. या पूर्ण प्रक्रियेत व्यक्तीला 16 तास उपाशी राहावं लागतं. आजकाल वजन वाढणं (Weight Gain) एक सामान्य समस्या झाली आहे. वजन वाढण्यामागे बरेच कारण असू शकतात. एक्सपर्टस म्हणतात आपल्या शरीरावर दैनंदिन जीवनाचा आणि आपल्या डायटचा परिणाम दिसून येतो. असाही म्हंटल जातं जितकी तुमची लाईफस्टाईल (LifeStyle) आणि डायट चांगला असेल तितके जास्त तुम्ही फिट असाल. (Intermittent Fasting)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ काढता येत नाही. बाहेरचे पॅकेट फूड (Packet Food) आणि फास्टफूड (Fast Food) वेळ वाचवतो पण आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो, हे सत्य नाकारता येत नाही.

 

प्रख्यात आहारतज्ञ मंजू मलिक (Dietitian Manju Malik) म्हणतात योग्य डायट (Correct Diet) आणि व्यायामाबरोबरच हल्ली इंटरमिटंट फास्टिंगचा (Intermittent fasting) ट्रेंड वाढत चालाय. बरेंच आहारतज्ञ इंटरमिटंट फास्टिंगला वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पद्धत मानतात.

 

काय असत इंटरमिटंट फास्टिंग? (What is Intermittent Fasting)
इंटरमिटंट फास्टिंग हि योग व व्यायामा सारखीच वजन कमी करायची एक उत्तम व फायदेशीर पद्धत आहे. इंटरमिटंट फास्टिंग हि आहार योजना नाहीये. या प्रक्रियेत व्यक्तीला 24 तासातले 16 तास उपाशी राहावं लागत. तब्बल 16 तासानंतरच व्यक्ती काही खाऊ शकतो. जेवायची वेळ 8 तास निर्धारित केलेली असते. याचा अर्थ जर तुम्ही रात्री 7 वाजता जेवला असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताच तुम्ही खाऊ शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘इंटरमिटंट फास्टिंग’चे लाभ (Benefits Of Intermittent Fasting) –
मंजू मलिक म्हणतात जेव्हा आपण काही खातो तेव्हा आपल्या शरीरातील इन्सुलिन (Insulin) वाढतो आणि
ते शुगर (Sugar) बनून आपल्या यकृत (Liver) मध्ये साठत जात. याच अंतिम परिणाम म्हणजे यकृत मध्ये चरबी साठणं सुरु होतं.
शिवाय इंटेमिंटेटनं फास्टिंग मध्ये तीच शुगर शरीर ऊर्जा बनवण्यात वापरली जाते. जितक्या वेळ तुम्ही उपाशी (Fast) असाल तितकी चरबी (Fat) कमी होत असते.

 

या 8 तासात काय खायला पाहिजे?
या कालावधीत तुम्ही हिरव्या पालेभाजी (Green Vegetables) किंवा फळ (Fruits) खाऊ शकता.
विशेष म्हणजे या 8 तासात कोणताही फास्टफूड तुम्ही खाणार नाही याची दक्षता घ्या.
योग्य परिणामासाठी आणि इंटरमिटंट फास्टिंग यशस्वी होण्यासाठी वरील गोष्टी पाळा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Intermittent Fasting | weight loss tips what is intermittent fast and it helps to reduce weight know everything about it

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Labh Yojana | एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर मिळेल 20 लाखाचा फंड, केवळ 252 रुपयांची करावी लागेल गुंतवणूक; जाणून घ्या

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना

Fitness Tips | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलकडून जाणून घ्या ‘या’ 5 फिटनेस टिप्स

 

Related Posts