IMPIMP

IPL 2023 | आता IPL मध्ये लागू होणार इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम; जाणून घ्या नियम

by nagesh
IPL 2023 | ipl 2023 bcci introduces new rule for new season impact player rule know wht

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – लवकरच IPL 2023 ला सुरुवात होणार आहे. या IPL साठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे.
इम्पॅक्ट प्लेअर असे या नियमाचे नाव आहे. खरंतर हा नियम याआधी फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलमध्ये वापरला जात होता. मात्र यंदा
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच त्याचा वापर होणार आहे. ट्विटरवरून आयपीएलने याची माहिती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-
20 ट्रॉफीमध्ये हा नियम लागू करण्यात आला होता. तसेच आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने नियमातील मूळ गोष्टी तशाच ठेवल्या आहेत. (IPL 2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय आहे हा नियम?

इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार भाग घेणाऱ्या संघांना टी-20 सामन्यावेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधील एका सदस्याला बदलण्याची मुभा असणार आहे. नियमानुसार एखाद्या संघाला बदल करणे योग्य वाटत असेल तर सामन्यावेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधील एक खेळाडू संघाला बदलता येऊ शकतो.इम्पॅक्ट प्लेअर एका डावातील 14 व्या षटकाच्या आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही खेळाडुची जागा घेऊ शकतो. (IPL 2023)

 

 

सामन्याच्या अगोदर नाणेफेक करताना दोन्ही संघांच्या कर्णधारांना प्लेइंग इलेव्हनसोबत 4 अशा खेळाडूंची नावे द्यावी लागतील ज्यांना ते सामन्यादरम्यान पर्याय म्हणून वापरू शकतील. यापैकी एकाला संघातील खेळाडुचा सब्सटिट्यूट म्हणून संघात जागा देता येणार आहे. फक्त सामना सुरु असताना कर्णधार, मुख्य प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांना इम्पॅक्ट प्लेअरला आणण्याबाबत ऑन फिल्ड अधिकाऱ्यांना किंवा चौथ्या पंचांना कळवावे लागेल. सब्सटिट्यूट खेळाडू मैदानात एकदा आल्यानंतर मैदानातून बाहेर जाणाऱ्या खेळाडुला पुन्हा सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- IPL 2023 | ipl 2023 bcci introduces new rule for new season impact player rule know wht

 

हे देखील वाचा :

Naresh Mhaske | …यात शिवरायांचा अपमान नाही? नरेश म्हस्केंनी केली कविता

Shahrukh Khan | …म्हणून युजर्सनी शाहरुखच्या साधेपणाचे केले कौतुक

Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Pimpri Crime | बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

 

Related Posts