IMPIMP

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, जयंत पाटील यांचं निलंबन

by nagesh
Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session -2022) सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना आज सलग चौथ्या दिवशी देखील रंगला आहे. बोलू दिलं जात नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करु नका, असं म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपला संताप व्यक्त केला होता. यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन (Suspension) करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी (Disha Salian Death Case) विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी केली. यावेळी सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. आणि या गोंधळात विरोधकांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांनी घोषणाबाजीच्या वेळी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्षांसोबत त्यांची बैठक पार पडली आणि जयंत पाटील यांच्या अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यामुळे ‘अध्यक्ष महोद्य, तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे
जयंत पाटील म्हणाले होते. अजित पवार यांनी देखील ‘अध्यक्ष तुम्ही सत्ताधाऱ्यांना पाठिशी घालू नका’,
असे देखील म्हटले होते. पण जयंत पाटलांच्या निर्लज्ज या असंसदीय शब्दावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार
आक्रमक झाले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

 

हे देखील वाचा :

PM Kisan | १२ कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या दिवशी येऊ शकतो पीएम किसानचा १३वा हप्ता!

Deepak Kesarkar | ‘त्या’ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतलेला नाही – दीपक केसरकर

Sanjay Raut | राहुल शेवाळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

 

Related Posts