IPS Vidya Kulkarni | वरिष्ठ आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी, नवल बजाज यांची CBI च्या सह संचालकपदी नियुक्ती
सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – मूळच्या सोलापूरच्या असलेल्या आणि सध्या तामिळनाडू येथे कार्यरत असणाऱ्या आयपीएस अधीकारी विद्या जयंत कुलकर्णी (IPS Vidya Kulkarni) यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) सह संचालकपदी नियुक्ती झाली आहे. विद्या कुलकर्णी या 1998 च्या बॅचमधील तामिळनाडू केडरच्या (Tamilnadu cadre) आयपीएस अधीकारी (IPS Vidya Kulkarni) आहेत. त्यांची पुढील 5 वर्षासाठी CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
दरम्यान, त्यांच्यासोबत केंद्र सरकारने ओडिशाचे पोलीस दलातील (Odisha Police) आयपीएस अधिकारी नजानिश्याम उपाध्याय (IPS Najanishyam Upadhyay) आणि महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) आयपीएस अधिकारी नवल बाजाज (IPS Naval Bajaj) यांचीही सीबीआय सह संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. (Senior IPS officers Vidya Jayant Kulkarni, Ghanshyam Upadhyay and Nawal Bajaj appointed as the Joint Directors in the Central Bureau of Investigation – CBI)
विद्या कुलकर्णी (IPS Vidya Kulkarni) या सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे या गावच्या मुळच्या रहिवासी आहेत.
तर त्यांचे सासर औरंगाबाद (Aurangabad) आहे. त्यांचे वडील स्टेट बँकेत (SBI) अधिकारी होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण तिऱ्हे या त्यांचा मुळ गावी झाले. 5 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण बार्शी (Barshi) येथे झाले.
तर उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूर (Solapur) येथे झाले.
सांगली (Sangli) येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून (walchand engineering college sangli) त्यांनी बी.ई. केले.
विद्या कुलकर्णी यांची सीबीआयच्या सह संचालक पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या गावी आनंद व्यक्त केला जात आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
Web Title :- IPS Vidya Kulkarni | Appointment of senior IPS officers Vidya Kulkarni and Naval Bajaj as joint directors of CBI
HM Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित
Comments are closed.