IMPIMP

ITR Filing Process | 15 मिनिटात स्वता भरा ITR, केवळ हे 4 पॉईंट ठेवा लक्षात, कुठेही जाण्याची नाही आवश्यकता!

by nagesh
ITR Verification | know all ways to verify income tax return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ITR Filing Process | इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. यावेळी ही तारीख वाढवली जाणार नसल्याचे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. प्राप्तीकर विभाग (Income Tax Department) लोकांना सतत आयटीआर फाइलिंग डेडलाइन (ITR Filing Deadline) ची वाट पाहू नका आणि विलंब न करता त्वरित ITR फाइल करण्यास सांगत आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे. म्हटल्याप्रमाणे सरकारने मुदत वाढवली नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. (ITR Filing Process)

 

अलीकडच्या काळात ITR भरणे खूप सोपे झाले आहे. जर तुमच्याकडे त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध असतील, तर तुम्हाला आयटीआर दाखल करण्यासाठी 15 मिनिटे लागतील. केवळ 4 पॉईंट लक्षात ठेवून तुम्ही तुमचा आयटीआर सहज दाखल करू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फॉर्म 16 किंवा 16ए मिळवा
पगारदार लोक, ज्यांना पगार मिळतो, अशा लोकांनी प्रथम त्यांच्या संस्थेकडून फॉर्म 16 किंवा 16ए मिळवावा. यामध्ये तुम्हाला तुमच्या पगाराशी संबंधित सर्व माहिती मिळेल जसे की बेसिक सॅलरी, एचआरए आणि इतर भत्ते. यापैकी अनेकांना करात सूटही मिळते.

 

जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांच्या उत्पन्नावर आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर आयटीआर भरावा लागेल. (ITR Filing Process)

 

तुमच्या कोणत्याही चालू खात्यात एक कोटी रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम जमा असल्यास, जर तुम्ही परदेश प्रवासावर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला असेल किंवा तुम्ही कोणत्याही वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल भरले असेल, तर तुम्हाला आयटीआर फाईल करणे आवश्यक आहे.

 

26एएस मध्ये टीडीएस तपशील तपासा
जर तुम्ही प्राप्तीकर रिटर्न भरणार असाल तर तुमची कागदपत्रे नक्की तपासा.
असाच एक दस्तऐवज फॉर्म 26एएस आहे. त्यात एकत्रित कर विवरण असते.
त्यात करदात्याच्या उत्पन्नातून कपात केलेल्या कराची संपूर्ण माहिती असते.
यामध्ये तुम्हाला टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स (TDS), टॅक्स कलेक्शन अ‍ॅट सोर्स (TCS), रेग्युलर टॅक्स,
रिफंड अशी माहिती मिळेल. मात्र, लक्षात ठेवा की कधीकधी 26AS फॉर्ममध्ये दिलेली माहिती देखील चुकीची असते.
त्यामुळे त्वरित ती दुरुस्त करा.

 

एआयएसमध्ये उत्पन्न आणि टीडीएस
एकदा तुम्ही तुमच्या 26AS मध्ये TDS, TCS तपासल्यानंतर, अ‍ॅन्युएल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) मिळण्याची खात्री करा.
त्यात बचत खात्याचे सर्व तपशील असतात. यामुळे बचत खात्यात जमा केलेल्या रकमेनुसार आयटीआर भरण्याची गरज आहे की नाही हे तुम्हाला कळेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कॅपिटल गेनचे स्टेटमेंट
जर तुम्ही स्टॉक आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला ब्रोकर आणि म्युच्युअल फंडांकडून कॅपिटल गेनचे स्टेटमेंट घ्यावे लागेल.
जर तुम्ही मालमत्ता विकली असेल आणि कर वाचवण्यासाठी ती कुठेतरी गुंतवली असेल तर तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल.
सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पात क्रिप्टोवर 30 टक्के कर जाहीर केला होता. मात्र, तो पुढील असेसमेंट इयर 2022-23 (AY23) पासून लागू होईल.

 

Web Title :- ITR Filing Process | if your are filing income tax return check tds tcs and 26as form details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे महापालिकेच्या कस्टमर केअरऐवजी भलत्याच क्रमांकावर संपर्क साधल्याने दीड लाखांची फसवणुक

Pune Crime | पुणे शहरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

Who Is Real Shiv Sena | खरी शिवसेना कोण? ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने दिली 8 ऑगस्टपर्यंतची मुदत; जाणून घ्या EC नं नेमकं काय-काय म्हंटलंय

 

Related Posts