IMPIMP

Jalna Crime News | नशेच्या भरात पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; जालन्यामधील घटना

by nagesh
Jalna Crime News | husband tried to finished himself by finished his wife at jalna bhokardan

जालना :  सरकारसत्ता ऑनलाईन – Jalna Crime News | जालन्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. यानंतर आरोपी पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळाळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील पळसखेड मूर्तड या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. (Jalna Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?

संगिता अर्जुन सोनवणे असे या प्रकरणातील मृत महिलेचे नाव आहे. तर अर्जुन सोनवणे असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी अर्जुन सोनवणे हा आपल्या कुटुंबासह वरुड शिवारात राहत होता. आरोपी अर्जुनला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते. यामुळे घरात वाद होत होते. (Jalna Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

घटनेच्या दिवशी संगीता या मुलासह अंगणात गहू वाळवत होत्या. यादरम्यान अर्जुन दारू पिऊन त्या ठिकाणी आला आणि त्याने आपली पत्नी संगीता हिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात वाढला. यानंतर आरोपी अर्जुनने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. यादरम्यान जखमी संगीता यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अर्जुन सोनवणे याला उपाचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मृत संगीता हिचा भाऊ संयज गावंडे यांच्या तक्रारीहून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Web Title :-  Jalna Crime News | husband tried to finished himself by finished his wife at jalna bhokardan

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीशी व आईसोबत गैरवर्तन, फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक; पिंपरी परिसरातील प्रकार

Manasi Naik | मानसी नाईक लवकरच करणार हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Sidharth-Kiara Wedding | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार; शाही महालात पार पडणार लग्न

 

Related Posts