IMPIMP

Pune Crime | खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक, हवेली तालुक्यातील घटना

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ऊसाच्या गुऱ्हाळासाठी घेतलेल्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्यांची 9 लाख 80 हजारांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार हवेली तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) एकाच्या विरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल केला.

 

या प्रकरणी भगवान काळे (वय ५५, रा. वाळकी, ता. दौंड, जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश परशुराम कोतवाल (वय ५५, रा. अष्टापुर, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भगवान काळे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करुन पुणे शहरातील रसवंतीगृह चालकांना ऊसाचा पुरवठा करतात.
काळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोतवाल यांच्यासह पाच शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता.
त्यानंतर कोतवाल यांच्यासह पाच शेतकऱ्यांचे पैसे काळे यांनी थकविले. कोतवाल यांनी पैशांबाबत विचारणा केली.
तेव्हा काळे यांनी पैसे देण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. गेले दोन वर्ष कोतवाल यांच्यासह पाच शेतकरी काळे यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

 

काळे यांनी नऊ लाख 80 हजार रुपये परत देण्यास टाळाटाळ केल्याने कोतवाल यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 10 lakh fraud of a farmer without paying for the purchased sugarcane, an incident in Haveli taluka

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मोटारीची काच फोडून लॅपटॉप लांबविले, मार्केट यार्ड परिसरातील घटना

Pune PMC-Traffic Police | पुणे महापालिकेने वाहतूक पोलिसांना त्यांचे ‘कर्तव्य’ निदर्शनास आणून दिले ! बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा; बस, रिक्षा अधिकृत थांब्यांवरच थांबतील अशी कार्यवाही करावी

MLA Ravi Rana | बच्चू कडूंच्या टीकेला आमदार रवी राणांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘बच्चू कडू हा सोंगाड्या आहे’

Chhagan Bhujbal | मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, 31 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती झाली नाही, तर टोल नाके बंद करू, छगन भुजबळांचा इशारा

 

Related Posts