IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

by nagesh
MNS | mns sandeep deshpande slams shivsena uddhav balasaheb thackeray over saamana

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाइन  शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे यांना आव्हान देत महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. याच दरम्यान भाजपच्या नेत्यांनी देखील राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युती (BJP-MNS Alliance) होणार अशी चर्चा रंगत असताना आज त्यांनी राज्य सरकारच्या (State Government) एका निर्णयावर संताप व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्राला आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये (Municipal Election) नगराध्यक्षपदाची (Mayor) निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) घेतला. या निर्णयाला मंजुरी देखील देण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड देखील जनतेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राज ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.

 

राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीची आजपर्यंत जी पद्धत होती, तीच सुरु राहिली पाहिजे.
ज्याचं बहुमत त्याचाच सरपंच (Sarpanch) बसला पाहिजे.
ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा नगराध्यक्ष आणि महापौर बसला पाहिजे.
यातून तुम्ही कोणाला तरी जबाबदार धरु शकता. नव्या सिस्टममुळे आपण कोणाला जबाबदार धरायचं,
असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होतो. सरकार बदललं की लगेच ठरवतात निवडणुका कशा घ्यायच्या.
मग निवडणूक आयोग (Election Commission) नक्की करतंय तरी काय? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
आता यावर राज्य सरकार कसे उत्तर देते हे पहावं लागेल.

 

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray attacks eknath shinde devendra fadanvis state government

 

 

हे देखील वाचा :

Jayant Patil On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जाणार का? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर, म्हणाले…

Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका

MNS Chief Raj Thackeray | ‘होय… माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे…’, राज ठाकरेंकडून नागपूरची कार्यकारिणी बरखास्त

 

Related Posts