IMPIMP

Kangana Ranaut | कंगनाच्या विरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी; पोलिसांकडे तक्रार

by nagesh
Kangana Ranaut | mumbai congress leaders files complaint against actress kangana ranaut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kangana Ranaut | बाॅलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही सातत्याने वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. नुकतंच कंगणाने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने चांगलीच अडचणीत सापडली आहे. या विधानावरुन सोशल मिडियावर तिच्यावर टीका होत आहे. तर कंगना राणावत हिच्याविरोधात मुंबई काँग्रेस पक्षाने (Congress) आज (शनिवारी) तीव्र आंदोलन केले आहे. तसेच अंधेरी पूर्व येथील पोलीस ठाण्यात (Andheri police station) तक्रार देत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा (Crime of treason) दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आज आम्ही देशातील नागरिकांच्या भावना मांडण्यासाठी येथे आलो आहोत. कंगना राणावतसारखी (Kangana Ranaut) चित्रपटात काम करणारी एक छोटी नटी देशाला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती म्हणत आहे. थोर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांचा हा अपमान आहे. एवढंच नव्हे तर कंगनाच्या वक्तव्याने देशातील 132 कोटी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच तिच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) म्हणाले.

पुढे ते म्हणाले, अंधेरी पोलीस ठाण्यात (Andheri police station) येऊन आम्ही कंगनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. देशद्रोहाचा गुन्हा हा पोलीस ठाण्यात दाखल होत नाही. त्यामुळे पोलीस आमच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून न्यायिक प्रक्रियेनुसार कंगनावर गुन्हा दाखल करून घेतील अशी अपेक्षा असल्याचे जगताप यांनी पुढे नमूद केले. कंगनाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Government) पद्मश्री पुरस्कार दिला असून देशाचा अपमान करणाऱ्या कंगनाकडून हा पुरस्कार काढून घेतला गेला पाहिजे, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, कंगणाच्या विधानाविरोधात मुंबईत आज काँग्रेसने (Congress) तीव्र निदर्शने केली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
यावेळी कंगना राणावत तसेच केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
निदर्शनांनंतर अंधेरी पूर्व येथील पोलीस ठाण्यात कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली.
कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली.
यावेळी माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam), माजी मंत्री सुरेश शेट्टी (Suresh Shetty),
माजी आमदार अशोक जाधव (Ashok Jadhav), जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस (Clive Dias), सूरजसिंह ठाकूर (Suraj Singh Thakur) उपस्थित होते.

 

Web Title :- Kangana Ranaut | mumbai congress leaders files complaint against actress kangana ranaut

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | रातोरात लखपती व्हायचे आहे का? पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवा 10 हजार; उघडेल नशीब

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर आरोप, म्हणाले – ‘BJP ने कोळसा घोटाळेबाजांकडून देगण्या घेतल्या’

Sharad Pawar | भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात’

 

Related Posts