IMPIMP

धक्कादायक ! मराठी भाषेचे स्टेट्स ठेवले म्हणून चौघांना मारहाण, कानडी पोलिसांची गुंडगिरी

by pranjalishirish
karnataka police beat up four youth for marathi language status

बेळगाव : महाराष्ट्र आणि बेळगावमध्ये सीमावादावरून मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता याच कर्नाटक पोलिसांचा Police मुजोरपणा समोर आला आहे. मराठी भाषिक तरुणांनी मराठी भाषेचे व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले होते. त्यावरून पोलिसांनी या चारही तरुणांना अमानुषपणे मारहाण केली.

बेळगाव येथील मच्छे गावात राहत असलेल्या या तरुणांनी ‘मराठी भाषिक वाघ आहे’, असे स्टेट्स ठेवले होते. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी Police  त्यांना जाब विचारत मारहाण केली. त्यामध्ये पोलिसांनी Police  या तरुणांच्या हाताला, पाठीला आणि पायांवर पट्ट्याने मारहाण केली. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा कर्नाटकात जाळण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती.

कोल्हापूरमधील एका थिएटरमध्ये घुसून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडला होता.
कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडले होते.
त्यानंतर शिवसैनिकांनी कोल्हापुरातील कन्नड बोर्डावर काळ फासले.
या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी एक व्हिडिओ जारी करत इशारा दिला आहे.
त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर शिवसेना स्टाइलने कारवाई करण्यात येईल’.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

‘कोरोना’ पॉझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली अभिनेत्री गौहर खान ! FIR दाखल

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Related Posts