IMPIMP

Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीच्या दुबईवरून आलेल्या महिला साथीदार ‘कुसुम’ला अटक

by nagesh
Kiran Gosavi | NCB Punch in Aryan Khan Drugs Case Kiran Gosavi's female accomplice Kusum gaikwad from Dubai arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचा (NCB) मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटकेत असलेल्या किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे नोकरीचे आमिष (lure of a job) दाखवून फसवणूक (Cheating) केल्या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हा दाखल झाला असतानाच, दुसरीकडे या प्रकरणात त्याची साथीदार असलेल्या कुसुम गायकवाड (Kusum Gaikwad) हिला लष्कर पोलिसांनी (lashkar police ) अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कुसुम गायकवाड दुबईहून परत येताच मोठ्या शिताफिने लष्कर पोलिसांनी तिला बेड्या (Arrest) ठोकल्या. किरण गोसावी (Kiran Gosavi) याची सहकारी असलेल्या कुसुमवर देखील शिवराज जामदार (Shivraj Jamdar) या तरुणाकडून 1 लाख 30 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. कुसुम गायकवाडकडून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लष्कर पोलिसांनी यापूर्वी गोसावीची महिला साथिदार शेरबानो कुरेशीला (Sherbano Qureshi) अटक केली आहे.

 

राज्यात 10 गुन्हे दाखल

किरण गोसावी याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 4 तर पिंपरी चिंचवडमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच राज्यात इतर भागात देखील गुन्हे दाखल झाले आहेत.
किरण गोसावी याच्यावर राज्यात आतापर्यंत 10 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
गोसावी याच्यावर फसवणुकीचा पहिला गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) दाखल झाला होता.
त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गोसावीला अटक केल्यानंतर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Kiran Gosavi | NCB Punch in Aryan Khan Drugs Case Kiran Gosavi’s female accomplice Kusum gaikwad from Dubai arrested

 

हे देखील वाचा :

SBI Credit Card | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार मोठा फटका ! 1 डिसेंबरपासून ट्रांजक्शन होणार महाग; जाणून घ्या किती वाढणार शुल्क

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts