IMPIMP

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 92 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 96 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 255 इतके कोरोना बाधित (Pune Corona) रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 95 हजार 419 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हे रुग्ण पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील आहेत.
आतापर्यंत पुणे शहरात 9082 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरात 754 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 4890 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 36 लाख 11 हजार 922 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 754 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 102 रुग्ण गंभीर आहेत.
तर 96 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Corona | 96 patients discharged from Corona in Pune in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बोपदेव घाटात दरोडा टाकून तरुणांना लुटणारे टोळके जेरबंद

Pune Crime | बनावट दागिने दाखवून कारागिराने केली दीड कोटी रुपयांची फसवणूक; रविवार पेठेतील घटना

Amravati Violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद अमरावतीमध्ये, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts