IMPIMP

SBI Credit Card | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार मोठा फटका ! 1 डिसेंबरपासून ट्रांजक्शन होणार महाग; जाणून घ्या किती वाढणार शुल्क

by nagesh
SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एसबीआय ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) वापरत असाल तर तुम्हाला या बातमीने झटका बसू शकतो. आता एसबीआय कार्डने शॉपिंग करणे अवघड होऊ शकते. आता एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे (SBI Credit Card) करण्यात येणार ईएमआय ट्रांजक्शनसाठी आता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने ही घोषणा केली आहे
की ईएमआय ट्रांजक्शनसाठी आता कार्डधारकांना 99 रुपयांची प्रोसेसिंग फी आणि त्यावर टॅक्स चुकवावा लागेल. हा नवीन नियम 1 डिसेंबर 2021 पासून लागू होईल.

 

द्यावा लागतील इतर प्रोसिसिंग चार्ज

 

एसबीआय आपल्या कोट्यवधी ग्राहकांकडून एसबीआयसीपीएसएल रिटेल आऊटलेट आणि अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर करण्यात आलेल्या सर्व ईएमआय ट्रांजक्शनसाठी प्रोसेसिंग फी चार्ज (SBI Credit Card) करणार आहे.
ही फी खरेदारांना ईएमआयमध्ये बदलल्यास लागणार्‍या इंटरेस्ट चार्जच्या एक्स्ट्रा आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन चार्जबाबत माहिती दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

प्रोसिसिंग चार्ज ईएमआयमध्ये परिवर्तित ट्रांजक्शनवर लागू होतात. आता नवीन नियमानुसार, 1 डिसेंबरपूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही ट्रांजक्शनवर या प्रोसिसिंग
चार्जमधून सूट दिली जाईल. कंपनी रिटेल आऊटलेटवर खरेदी करताना चार्ज स्लिपच्या माध्यमातून कार्डधारकांना ईएमआय ट्रांजक्शनवर प्रोसिसिंग चार्जबाबत सांगेल.

 

या विषयात ऑनलाइन ईएमआय ट्रांजक्शनसाठी कंपनी पेमेंट पेजवर प्रोसिसिंग चार्जबाबत माहिती देईल.
जर तुमचे ईएमआय ट्रांजक्शन कॅन्सल झाले तर प्रोसेसिंग फी परत केली जाईल.
मात्र, प्री-क्लोजरच्या स्थितीत ती परत केली जाणार नाही. इतकेच नव्हे, EMI मध्ये कन्व्हर्टेड ट्रांजक्शनसाठी रिव्हॉर्ड पॉईंट लागू होणार नाहीत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : SBI Credit Card | sbi customers alert emi transactions will be expensive from december 1 know how much increased charges

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | बोपदेव घाटात दरोडा टाकून तरुणांना लुटणारे टोळके जेरबंद

 

Related Posts