IMPIMP

Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंचा तिसरा हातही भ्रष्टाचारात, ‘हा’ नेता भाजपच्या रडारवर

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत (Sanjay Raut) तुरुंगात आहे. तर डावा हात असलेल्या अनिल परब (Anil Parab) यांचे रिसॉर्ट तुटणार आहे. तर तिसरा हात असलेल्या आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. महाकाली गुफा प्रकरणात (Mahakali Cave Case) वायकरांनी केलेला घोटाळा हा 500 कोटींहून अधिक असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि आमदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात आरोप केले. अंधेरीतील महाकाली गुफा परिसरातील विकासाच्या कामात रविंद्र वायकर यांनी घोटाळा (Scam) केला असल्याचे सोमय्यांनी म्हटले. महाकाली गुफेसाठी वायकर यांनी 500 कोटी रुपये बिल्डरला दिले आहेत. अविनाश भोसले (Avinash Bhosale), शाहीद बलवा (Shahid Balwa) आणि विनोद गोएंका (Vinod Goenka) हे बिल्डर लाभार्थी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेले संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Scam) अटकेत आहेत. दुसरा हात असलेले अनिल परबही त्याच मार्गावर आहेत. तेही लवकरच जेलमध्ये जातील. आता ठाकरे यांचे विश्वासू असलेले वायकर देखील घोटाळ्यात अडकल्याचे सोमय्यांनी सांगितले.

 

 

याकूब मेमन प्रकरणावर आयुक्तांनी माफी मागावी

 

याकूब मेमन कबरीच्या (Yakub Memon Grave) सजावटीवरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.
या प्रकरणावरुन मुंबई महापालिका आयुक्तांनी (Mumbai Municipal Corporation Commissioner) जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
तसेच ज्या महापालिका अभियंत्यांनी आणि विश्वस्तांनी याकूबला शहीद बनवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
देशद्रोहाचा कलम त्यांच्यावर लागला पाहिजे असेही सोमय्या यांनी म्हटले.

 

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp kirit somaiya allegation ravindya vaykar shivsena chief uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Skin Treatment | पायांची शायनिंग वाढवण्याची आश्चर्यकारक पद्धत, घरीच घालवा’ हे’ काळे डाग

CM Eknath Shinde | शिवसेना भवनाजवळच एकनाथ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय

Diabetes Diet | कच्च्या भाज्या खाऊन दूर होऊ शकते का डायबिटीजची समस्या, जाणून घ्या किती परिणामकारक आहे ‘हे’ खाणे

Yakub Memon Grave | याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद

 

Related Posts