IMPIMP

Kirit Somaiya | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांचा आणखी एक गंभीर आरोप

by nagesh
Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya reveal one more scam of cm uddhav thackeray brother in law shridhar patankar shreeji homes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला होता.
त्याप्रमाणे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्याबाबत आणखी एक आरोप केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

श्री जी होम्स या कंपनीकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं एक इमारत उभारण्यात आली.
या इमारतीच्या बांधकामासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला.
हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishore Chaturvedi) याच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत.

 

कोमो स्टॉक्स (Como Stocks) या कंपनीच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
श्रीधर पाटणकर हे ज्या श्री जी होम्स या कंपनीत पार्टनर आहेत, त्या कंपनीत 29 कोटींपेक्षा जास्त मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) झालं आहे त्या कंपनीशी आणि आपला काय संबंध आहे असा सवाल सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

 

केंद्रीय तपास यंत्रणा अनेक दिवसांपासून नंदकिशोर चतुर्वेदीला शोधत आहेत. मात्र, तो सापडत नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदकिशोर चतुर्वेदीचा पत्ता सांगावा.
अन्यथा ED आणि कंपनी मंत्रालयाने नंदकिशोर चतुर्वेदी याला फरार म्हणून घोषित करावं.
मी नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तीन कंपन्यांच्यामार्फत झालेले गैरव्यवहार उघड करत पुरावेही दिले होते मात्र यावर मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही, असं सोमय्या म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, श्री जी होम्स या कंपनीत आर्थिक व्यवहार झाला त्यामध्ये दोनवेळा पैसे आले होते.
त्यातील पहिली नोंद ही 5 कोटी 86 लाख 80 हजार 902 आहे. तर दुसरी नोंद ही 23 कोटी 75 लाख 48 हजार 818 इतक्या रूपयांची आहे.
त्यासोबतच या कंपनीमध्ये श्रीधर पाटणकर हे भागीदार असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya reveal one more scam of cm uddhav thackeray
brother in law shridhar patankar shreeji homes

 

हे देखील वाचा :

Pune Wakad Crime | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून नराधमाकडून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Kishori Pednekar | ‘त्याचं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान अन्…’;किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर निशाणा

 

Related Posts