IMPIMP

Kirit Somaiya On Sanjay Raut | ‘मी दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो’ – किरीट सोमय्यांचं स्पष्टीकरण

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on bjp kirit somaiya gets clean chit from mumbai police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya On Sanjay Raut | सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाईचा दणका दिला आहे. संजय राऊत यांच्या अलिबाग (Alibag) येथील भूखंड आणि मुंबईमधील (Mumbai) राहत्या घरावर छापेमारी केली आहे.
यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
यावरुन भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Kirit Somaiya On Sanjay Raut)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, की ”संजय राऊत यांचे स्नेही आणि व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राऊत यांनी धावपळ सुरू केली होती.
राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात मोठी रक्कम कशी आली,
याची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती.
प्रवीण राऊत प्रकरणातही संजय राऊत यांची काय भूमिका आहे, याचा तपास करण्यात यावा,
अशी मागणीही मी दिल्लीत ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांना भेटून केली होती, असं ते म्हणाले.

 

पुढे किरीट सोमय्या म्हणाले, ”संजय राऊत यांना वाटलं की 55 लाख रुपये ईडी कार्यालयात जमा केल्याने आणि ईडीच्याच अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई टाळली जाईल.
पण, जेव्हा राऊत यांनी पैसे ईडी कार्यालयात जमा केले होते तेव्हाच त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं स्पष्ट झालं होतं.
तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राऊत यांना जाब का विचारला नाही.”

 

Web Title :- Kirit Somaiya On Sanjay Raut | i had met the ed officials in delhi kirit somaiyas revelation after ed action against sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बालसुधारगृहातून सुटताच कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार; येरवड्यातील सरगम हॉटेलजवळील घटना

Prediabetes Symptoms | प्री-डायबिटीजच्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, बचाव करतील ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय

Nilesh Rane on Sanjay Raut | ‘सामना’तील कष्टातून…? राऊतांना निलेश राणेंचा सवाल !

 

Related Posts