IMPIMP

Mumbai Unlock | मुंबईकरांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात 100 टक्के अनलॉक?

by nagesh
Mumbai Unlock | mumbai may be unlocked in next week due decrease in corona cases said bmc Additional Commissioner Suresh Kakani

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तर रिकव्हरी रेटमध्येही (Corona Recovery Rate) सातत्याने सुधारणा होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईकरांना निर्बंधांबाबत (Mumbai Unlock) खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने मुंबई महापालिकेनं (BMC) निर्बंधातून सूट देण्याचा विचार सुरू केला आहे. कोरोना संदर्भात या आठवड्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध (Mumbai Unlock) शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC Additional Commissioner Suresh Kakani) यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काकाणी म्हणाले की, मुंबईतील कोरोनाची (Mumbai Corona) परिस्थिती नियंत्रणात आहे. आसपासच्या शहरातील परिस्थितीही नियंत्रणात राहिल्यास निर्बंधांबाबत कोविड टास्क फोर्सशी (Covid Task Force) संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतरच सध्याचे निर्बंध थोडे शिथिल होतील. पुढील आठवड्यापर्यंत निर्बंध (Restrictions) हटवण्याची परवानगी मिळेल. सध्याची परिस्थिती पाहिली तर बाधितांची संख्या कमी झालेली आहे. रिकव्हरी रेटमध्येही सातत्याने सुधारणा होत आहे. त्यामुळे फेब्रुवारीत मुंबई अनलॉक (Mumbai Unlock) होऊ शकते. मात्र अनलॉक झाले तरी मुंबईकरांना कोरोना नियमांचे (Corona Rules) पालन करणे आवश्यक राहणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.

 

 

काही दिवसांपासून मुंबईत ५००हुन अधिक कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून येत आहेत.
मात्र सोमवारी मुंबईत (Mumbai) ३५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला शहरात २००-२५० रुग्ण सापडत होते.
मात्र २१ डिसेंबरनंतर हा आकडा २० हजारांच्या घरात गेला.
वाढती बाधितांची संख्या लक्षात घेत पालिकेने निर्बंध लागू केले.
त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आल्याने अनेक निर्बध मागे घेण्यात आले.

 

Web Title :- Mumbai Unlock | mumbai may be unlocked in next week due decrease in corona cases said bmc Additional Commissioner Suresh Kakani

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा लवकरच 3 % वाढू शकतो DA, वार्षिक 90,000 रुपयांपर्यंत फायदा; जाणून घ्या कॅलक्युलेशन

Praveen Kumar Death News | महाभारतातील ‘भीम’चे निधन, अमिताभ-जितेंद्र यांच्यासोबत सुद्धा केले होते काम

Aadhaar Not Mandatory For Covid Vaccination | कोरोना व्हॅक्सीनसाठी ‘आधार’ कार्ड अनिवार्य नाही, ‘या’ 9 कागदपत्रांपैकी कोणत्याही एकाचा करू शकता वापर; जाणून घ्या

 

Related Posts