IMPIMP

Kirtankar Tajuddin Maharaj | प्रसिद्ध किर्तनकार ताजुद्दीन महाराज कालवश; किर्तन सुरु असतानाच हृदयविकाराचा झटका

by nagesh
Kirtankar Tajuddin Maharaj | kirtankar tajudding maharaj passed away while ongoing kirtan after suffering heart attack in nandurbar watch live video

सरकारसत्ता ऑनलाइन  – Kirtankar Tajuddin Maharaj | राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह. भ. प. ताजुद्दीन बाबा महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Died) झाले आहे. काल (सोमवारी) रात्रीच्या दरम्यान किर्तन सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा (Heart attack) झटका आला, आणि ते खाली कोसळले. ही घटना नंदुरबार याठिकाणी घडली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ताजुद्दीन महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते मंचावरच खाली बसले. कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे किर्तनाचे लाईव्ह शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झालीय.

 

दरम्यान, ताजुद्दीन महाराजांचा (Kirtankar Tajuddin Maharaj) जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता.
त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनीमध्ये कामही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती.
त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला होता.
त्याचबरोबर हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली.
ते घनसावंगी (Ghansavangi Jalna) तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते.
त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांची देऊळ उभे केले होते. महाराष्ट्रात कीर्तनाची एक मोठी परंपरा आहे.
अनेक कीर्तनकारांप्रमाणेच ताजुद्दीन महाराज हे सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने त्यांचा किर्तनकार थंडावला आहे.

 

Web Title : Kirtankar Tajuddin Maharaj | kirtankar tajudding maharaj passed away while ongoing kirtan after suffering heart attack in nandurbar watch live video

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, पुण्याच्या उत्तमनगरमधील घटना

Jalgaon Politician | कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र; जळगावकरांना बसला आश्चर्याचा धक्का

Pune Police-PMC | पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

Nagpur Crime | काय सांगता ! होय, एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रानं विवाहितेसोबत भलतच ‘कृत्य’

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

 

Related Posts