IMPIMP

Kisan Vikas Patra (KVP) | तुमची रक्कम करायची असेल दुप्पट तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पैसे बुडण्याची अजिबात नाही भीती

by nagesh
Kisan Vikas Patra (KVP) | kisan vikas patra kvp if you want to double your money then invest in this scheme there is no fear of losing money

नवी दिल्ली :वृत्तसंस्था किसान विकास पत्र Kisan Vikas Patra (KVP) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची रक्कम दुप्पट करू शकता. ही योजना भारतीय टपाल कार्यालयाद्वारे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिली जाते. ही एक फिक्स्ड रेट सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुमची रक्कम 124 महिन्यांत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होईल. Kisan Vikas Patra (KVP)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किसान विकास पत्रामध्ये Kisan Vikas Patra (KVP) सध्या 6.9 टक्के चक्रवाढ व्याज दिले जात आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. त्यानंतर 100 च्या पटीत गुंतवणूक वाढवता येते. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

 

हे उघडू शकतात खाते

योजनेअंतर्गत, कोणताही प्रौढ व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो. अल्पवयीन मुलाचे वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते त्याच्या नावावर होते. याशिवाय तीन व्यक्ती एकाच वेळी संयुक्त खाते उघडू शकतात.

 

ही कागदपत्रे आवश्यक

किसान विकास पत्र योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, निवासी पुरावा, KVP अर्ज, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ग्राहक किसान विकास पत्र खरेदी करू शकतात. KVP प्रमाणपत्रे रोख, चेक, पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे देखील खरेदी करता येतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

KVP करू शकता ट्रान्सफर

ग्राहक त्यांचे किसान विकास पत्र खाते, पोस्ट ऑफिस (Post Office) च्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेत ट्रान्सफर करू शकता.
तसेच केव्हीपी एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.
यामध्ये नॉमिनी सुविधा देखील उपलब्ध आहे. किसान विकास पत्र देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येते.

 

द्यावा लागेल इतका कर

आयकर नियमांनुसार (Income Tax Rules), किसान विकास पत्रातून मिळणारे व्याज करपात्र आहे.
हे उत्पन्न ’अन्य स्रोत’ अंतर्गत करपात्र आहे. या व्याजावर गुंतवणूकदाराला दोन पर्याय मिळतात.
पहिली म्हणजे ’कॅश बेसिस’ कर आकारणी आणि दुसरी वार्षिक व्याजावरील कर.

 

Web Title :- Kisan Vikas Patra (KVP) | kisan vikas patra kvp if you want to double your money then invest in this scheme there is no fear of losing money

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ शेअरमधून मिळतोय उत्कृष्ट परतावा; 1 लाखाचे झाले 10 लाख, जाणून घ्या

Nitin Gadkari On Sugarcane Farmers | ‘…तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Dilip Walse-Patil On Loudspeakers | अखेर भोंंग्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी सरकारची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले…

 

Related Posts