IMPIMP

Dilip Walse-Patil On Loudspeakers | अखेर भोंंग्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी सरकारची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले…

by nagesh
Dilip Walse-Patil On Loudspeakers | maharashtra home minister dilip walse patil on loudspeakers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse-Patil On Loudspeakers | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (Loudspeakers) काढण्याबाबत राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray), इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उपस्थित राहिले नाहीत. बैठकीला फक्त मनसेचे नेते होते. या पार पडलेल्या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil On Loudspeakers) यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शासन आदेशानुसार भोंग्यांचा वापर कायम राहणार असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी माहिती दिली आहे. वेगवेगळ्या समाजासाठी वेगळी भूमिका घेता येणार नाही, केंद्र सरकारने एक नियम करावा आणि त्या नियमाची अंमलबजावणी देशभर करावी, असं दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil On Loudspeakers) म्हणाले.

 

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत भोंग्यांवर बंदी घातली असून इतर वेळी आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची (Police) असून याचा भंग झाला तर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने पोलीस कारवाई करतील, असं वळसे पाटलांनी सांगितलं.

 

दरम्यान, राज्य सरकारने आता भोंगे उतरवणार नसल्याचं सांगितलं आहे.
त्यामुळे आता मनसे 3 तारखेला कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Dilip Walse-Patil On Loudspeakers | maharashtra home minister dilip walse patil on loudspeakers

 

हे देखील वाचा :

Ankylosing Spondylitis | पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका, एंजिलायझेशन स्पॉन्डिलायटीसची समस्या असू शकते

Cesarean Delivery | सिझेरियन प्रसूतीनंतर पुढील Pregnancy चं नियोजन कसे कराल? जाणून घ्या

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, हडपसर परिसरातील घटना

 

Related Posts