IMPIMP

Kolhapur Crime | उसणवारीच्या पैशासाठी वृद्ध महिलेचा खून; बाप-लेक पोलिसांच्या ताब्यात

by nagesh
Kolhapur Crime | father and son strangled the old woman who came to the house kolhapur crime news

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Kolhapur Crime | करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावात एका 75 वर्षीय वृद्धेचा बाप-लेकांनी मिळून खून
केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी बचाराम शंकर पाटील (वय 45) आणि त्याचे वडील शंकर पाटील (वय 70) यांना पोलिसांनी ताब्यात
घेतले आहे. लक्ष्मीबाई पाटील (वय 75) असे खून झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. त्या आरोपींच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या अंगावरील
दागिन्यांच्या मोहातून दोघांनी त्यांचा गळा दाबून खून केला आहे. (Kolhapur Crime)

 

पोलिसांनी याप्रकरणी गावातील तीन संशयितांना ताब्यात घेऊन बोलते केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गावात असलेल्या सीसीटीव्हीमुळे हा
प्रकार उघडकीस आला. फुटेजमध्ये लक्ष्मीबाई या आरोपींच्या घरी जाताना दिसतात. पण, त्या परत न आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे
संशयित तीन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Kolhapur Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बचाराम व शंकर या दोघांनी लक्ष्मीबाई घरी आल्यानंतर गळ्यातील दागिने काढून घेत त्यांचा गळा दाबून खून केला.
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पोत्यात भरून निगवे खालसा दरम्यानच्या ओढ्याखाली टाकल्याची कबुली दिली.
त्यांनी बऱ्याच जणांकडून उसणे पैसे घेतले होते. ते परत करण्यासाठी त्यांनी लक्ष्मीबाई यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांचा वापर केला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime | father and son strangled the old woman who came to the house kolhapur crime news

 

हे देखील वाचा :

Pune Police | स्व. सदू शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पुणे पोलीस उपविजेता

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा सलग पाचवा विजय; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय !!

Uday Samant | ‘जत तालुक्याच्या पाणीप्रश्नासोबतच शंभर हेक्टर जागेत एमआयडीसी उभारणार’ – उदय सामंत

Pimpri Chinchwad-PCMC News | कार्यशाळेस दांडी मारणे पीसीएमसीतील पदाधिकाऱ्यांना पडले महागात; थेट कारवाईचा इशारा

 

Related Posts