IMPIMP

Kukadi Dawa Kalwa | कुकडी डाव्या कालव्याचे 22 मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

by nagesh
 Kukadi Dawa Kalwa | Kukdi Dawa Kalwa release instructions from 22 May 4th rotation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Kukadi Dawa Kalwa | अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची (Ahmednagar Leader) आणि शेतकऱ्यांची
मागणी लक्षात कुकडी डाव्या कालव्यातून २२ जूनपर्यंत चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी
दिल्या. (Kukadi Dawa Kalwa)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कुकडी प्रकल्प (Kukadi Project) व घोड प्रकल्प (Ghod Project) कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे (MLA Ram Shinde), रोहित पवार (MLA Rohit Pawar), अतुल बेनके (MLA Atul Benke), अशोक पवार (MLA Ashok Pawar) (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार (Sudam Pawar), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad), महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे (Krishna Khore Vikas Mahamandal) कार्यकारी संचालक अतुल कपोले (Atul Kapole), मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ (Hemant Dhumal) आदी उपस्थित होते. (Kukadi Dawa Kalwa)

 

पाटील म्हणाले, धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे; पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे (Pune), अहमदनगर आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे.

 

धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठी वाढण्यास मदत होते. त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे. पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील १५ कि.मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजूरीनंतर सुरुवात करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

 

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागात मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दाही यावेळी चर्चिला गेला. सध्या शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया ही सुरु आहे. तूर्तास क आणि ड संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरून काम सुरू करावे, अशा सूचनाही पालककमंत्री पाटील यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या (Jalsampada Vibhag) अधिकाऱ्यांना दिल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.
बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध
पाणीसाठा व उन्हाळी हंगाम २ च्या नियोजनाबाबत सादरीकरण केले.

बैठकीस कार्यकारी अभियंता स. ज. माने, उ. द. धायगुडे, स्वप्निल काळे आदी उपस्थित होते.

 

 

Web Title :- Kukadi Dawa Kalwa | Kukdi Dawa Kalwa release instructions from 22 May 4th rotation

 

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Pune Crime News | कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात (Video)

Maharashtra Politics News | ‘ते काहीही बोलू शकतात. त्यांचं ते वैशिष्ट्य’, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

 

Related Posts