IMPIMP

Land Records Recruitment Exam Result | 15 डिसेंबरला भूमी अभिलेख भरतीचा निकाल होणार जाहीर; निकालासोबतच असणार प्रतीक्षा यादी

by nagesh
Land Records Recruitment Exam Result | land records recruitment exam result on 15th december

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन  – Land Records Recruitment Exam Result | गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी पुढे ढकललेली भूमी अभिलेख विभागाची (Bhumi Abhilekh Result Bharti News) परीक्षा नुकतीच पार पडली आहे. आता या परीक्षेच्या निकालासाठीचा मुहूर्त सापडला असून, येत्या १५ डिसेंबरला या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्व्हेअर) पदांसाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. परीक्षा अनेक दिवस रखडल्याने निकालही राखडेल, अशी भीती उमेदवारांच्या मनात होती. मात्र, परीक्षेच्या निकालाची तारीख लवकर जाहीर केली असून, उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. तसेच, भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यावेळी प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.

 

भूमी अभिलेख विभागातील पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४,
नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत.
अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत.
आता विभागनिहाय गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली
जाणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४८ हजार ११० उमेदवारांचे अर्ज
छाननीअंती स्वीकारले गेले. त्यातील ३२ हजार ६३ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, यामधून १११३ उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Land Records Recruitment Exam Result | land records recruitment exam result on 15th december

 

हे देखील वाचा :

Akshay Kumar | अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक आला समोर; दिग्दर्शकाने केली खोचक टिप्पणी

Basavaraj Bommai | आम्हाला सीमाभागात शांतता हवी आहे; पण… – बसवराज बोम्मई

Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन

 

Related Posts