IMPIMP

LIC Aadharshila Plan | महिलांसाठी LIC ची विशेष विमा योजना, रोज 29 रुपये जमा केल्यावर किती लाख मिळतील, जाणून घ्या

by nagesh
LIC Aadhaar Shila | lic adhaar shila policy know premium maturity benefits and gift this policy to your wife

नवी दिल्ली : वृत्त संस्थाLIC Aadharshila Plan | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC सतत नवनवीन विमा योजना आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली विशेष विमा योजना अधिक लोकप्रिय होत आहे. ’आधार शिला’ (LIC Aadharshila Plan) असे या योजनेचे नाव आहे. ही पॉलिसी फक्त त्या महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी लाँच करण्यात आली. लाईफ कव्हरसोबत, ही पॉलिसी बचत देखील देते. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळतील. या काळात या योजनेत कर्जही घेता येते.

 

 

1. किती कालावधीसाठी घेता येईल प्लान

8 ते 55 वयोगटातील कोणतीही महिला ही पॉलिसी घेऊ शकते. ही 10 वर्षांसाठी खरेदी केले जाऊ शकते. कमाल मुदत 20 वर्षे आहे. मॅच्युरिटीच्या वेळी महिलेचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

 

2. विमा रक्कम

या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल रक्कम 30 लाख रुपये आहे. यामध्ये पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो. (LIC Aadharshila Plan)

 

 

3. किती असेल प्रीमियम

जर एखादी महिला 20 वर्षांची असेल आणि पॉलिसीची मुदत देखील 20 वर्षांची असेल आणि तिने 3 लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक सुमारे 10,868 रुपये प्रीमियम भरावा लागेल. मात्र, पुढील वर्षी हा प्रीमियम 10,649 रुपयांपर्यंत खाली येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. मॅच्युरिटी बेनिफिट

मॅच्युरिटी झाल्यावर 4 लाख रुपये मिळतील. 2 लाख विमा रक्कम आणि शिल्लक रक्कम ही लॉयल्टी बोनस असेल.

 

 

5. प्रीमियम पेमेंट

या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा करता येईल. वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. परंतु, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याचे निवडल्यास, तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.

 

 

6. कॅश बेनिफिट

पॉलिसी सुरू झाल्यापासून 5 वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विम्याच्या रकमेइतकी रक्कम दिली जाईल.
परंतु, यानंतर मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनस देखील मिळेल.

 

 

7. सेटलमेंट

मॅच्युरिटीवर, तुम्ही पूर्ण पेमेंट एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये मिळवू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

8. सरेंडर करणे

सलग दोन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

 

Web Title : LIC Aadharshila Plan | lic aadharshila plan its benefits and everything you should know

 

हे देखील वाचा :

Immunity Booster Tips | ‘या’ टिप्स महिलांसाठी ठरतील उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढेल आणि आजार देखील होतील दूर

Instant Personal Loan | विना गॅरंटी ताबडतोब मिळेल 20 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

Benefits Of Tomato Bleach | 1 ‘टोमॅटो’ चेहऱ्याचा रंग बदलेल, एका महिन्यात चेहरा चमकेल; डागही नाहीसे होतील

 

Related Posts