IMPIMP

LIC Best Policy | एलआयसीची योजना ! फक्त 4 वर्ष प्रीमियम भरा आणि मिळवा 1 कोटी; जाणून घ्या सविस्तर

by bali123
LIC Best Policy | lic jeevan shiromani plan get rs1 crore just paying premium 4 years check all details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Best Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) हे अनेक वेगवेगळ्या पॉलिसी आणत असते. नागरीकांच्या हितासाठी एलआयसी विविध योजना आखत असते. खरंतर सर्वाधिक लोकांचा विश्वास या भारतीय आयुर्विमा महामंडळावर आहे. सुरक्षित गुंतवणूक (Secure investment) म्हणून अनेक लोक एलआयसी कडे पाहतात. अनेक नव्या पॉलिसी योजनेतून एलआयसी लोकांना चांगला नफा देत असते. दरम्यान, सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी एलआयसी हा एक उत्तम पर्याय आहे. (LIC Best Policy)

 

एलआयसीची एक महत्वाची योजना म्हणजे जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani Yojana) आहे. ही बचत गुंतवणूक योजना (Savings Investment Plan) आहे. या योजनेतून ग्राहकांना अधिक फायदा मिळू शकतो. LIC जीवन शिरोमणी योजना 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आलीय. ही योजना मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बँक योजना आहे. या बचत गुंतवणूक योजनेमधून ग्राहकांना मोठा नफा मिळू शकणार आहे.

 

एलआयसीची ही पॉलिसी (Policy) पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला योजने दरम्यान मृत्यू झाल्यास लाभाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्यही प्रदान करते. त्याचबबरोबर पॉलिसीधारक जिवंत असेल, तर निश्चित कालावधीत पैसे भरण्याची सुविधा दिली जाते. तसेच या व्यतिरिक्त मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते. या पॉलिसी मुदतीच्या वेळी ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर आधारित कर्ज घेऊ शकणार आहे. (LIC Best Policy)

 

1 कोटी रकमेची हमी –

एखाद्या ग्राहकाने चौदा वर्षांसाठी पॉलिसी घेतली, तर त्या ग्राहकाला एकूण 1 कोटीपर्यंत रिटर्न मिळू शकते. या योजनेमध्ये गंभीर आजारासाठी विमा संरक्षणही दिले (Insurance protection) जाते. ही बाजाराशी संबंधित नफा योजना आहे. एलआयसीच्या नॉन-लिंक्ड प्लॅनमध्ये (LIC Non-Linked Plan) संबधित ग्राहकाला किमान 1 कोटी रुपये विमा रकमेची हमी मिळते. या पॉलिसीमध्ये किमान रिटर्न एक कोटी रुपये दिला जातो आहे.

 

‘या’ एलआयसी Policy बाबात सविस्तर माहिती –

पॉलिसी टर्म – 14, 16, 18 आणि 20 वर्षे असणार.

कमाल विमा रक्कम – कोणतीही मर्यादा नाही.

4 वर्षे प्रीमियम भरावा लागणार.

किमान विमा रक्कम एक कोटी रुपये असणार.

वय – किमान वय 18 वर्षे असणार.

प्रवेशासाठी कमाल वय काय? – 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे, 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे, 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे.

 

Web Title : LIC Best Policy | lic jeevan shiromani plan get rs1 crore just paying premium 4 years check all details

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts