IMPIMP

Maharashtra Covid Restrictions | ‘…तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता’ – मंत्री अस्लम शेख

by Team Deccan Express
Maharashtra Covid Restrictions | increase in the number of corona infections restrictions are likely to be imposed in maharashtra including mumbai Guardian Minister Aslam Shaikh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Covid Restrictions | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्र पूर्वपदावर (Maharashtra Covid Restrictions) आला असला तरी सध्या काही प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ‘नागरिकांनी मास्कचा वापर करावा,’ असं आवाहन केलं आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी महाराष्ट्रातील निर्बंधाबाबत मोठं विधान केलं आहे.

‘राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता असल्याचं,’ अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. ”कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार (Maharashtra State Government) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे 1 हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध (Maharashtra Covid Restrictions) लादण्याची आवश्यकता असेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

अस्लम शेख पुढे म्हणाले, “ज्या पद्धतीने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावे लागतील.
विमान सेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत.
लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण हळूहळू वाढताना दिसत आहे.
26 मे रोजी राज्यात 500 हून जादा नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये 300 चा टप्पा ओलांडल्याने कोरोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झालीय.
बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) सप्टेंबर महिन्यामध्ये चौथी लाट येऊ शकते, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे.
चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की त्यांच्या सर्व जंबो कोविड – 19 सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.

Web Title :- Maharashtra Covid Restrictions | increase in the number of corona infections restrictions are likely to be imposed in maharashtra including mumbai Guardian Minister Aslam Shaikh

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts