IMPIMP

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 5 वरिष्ठ IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra IPS Transfer | राज्यातील 5 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस उपायुक्त (DCP), पोलीस अधीक्षक (SP) दर्जांच्या पोलीस अधिकारी यांची पदोन्नतीने (Promotion) बदली (Maharashtra IPS Transfer) करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी बुधवारी (दि.08) याबाबचे आदेश काढले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘निवडश्रेणी पोलीस अधीक्षक’ दर्जाच्या पदावरुन ‘पोलीस उप महानिरीक्षक’ (Deputy Inspector General of Police) दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्यासाठी छाननी समितीने तयार केलेल्या ‘निवडसूची-2022’ नुसार पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने (Promotion) बदली करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापनेस स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवून ‘पोलीस उप महानिरीक्षक’ या पदावर पदोन्नती देण्यात येत असून, पोलीस आस्थापना मंडळाच्या (Police Establishment Board) शिफारशींचा विचार करुन आणि महाराष्ट्र पोलिसांच्या अधिनियमांच्या (Maharashtra Police Act) तरतुदीनुसार पदोन्नतीने सुधारित पदस्थापना करण्यात आली आहे.

 

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे

1. राजेंद्र माने Rajendra Mane (पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई DCP State Intelligence Department, Mumbai (पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते पोलीस आयुक्त सोलापूर शहर Commissioner of Police, Solapur City)

 

2. पंजाबराव उगले Punjabrao Ugale (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे ACB Thane (पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर Addl CP Western Regional Division Thane City)

 

3. दत्तात्रय शिंदे Dattatraya Shinde (पोलीस अधीक्षक पालघर SP Palghar (पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर Addl CP East Regional Division, Thane City)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. महेश उ. पाटील Mahesh U. Patil (पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय DCP Mira-Bhayander-Vasai-Virar Commissionerate ते अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) बृहन्मुंबई Addl CP (Traffic) Brihanmumbai)

 

5. संजय बी जाधव Sanjay B. Jadhav (पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, पुणे SP Highway Safety Squad, Pune ते
अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर Addl CP (Administration), Thane City)

 

Web Title :- Maharashtra IPS Transfer | 5 senior IPS police officers in the state were promoted

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | राज्यातील ‘पोलीस अधीक्षक’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

 

Related Posts