IMPIMP

Maharashtra MLC Election-2022 | आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी; आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना

by nagesh
Maharashtra MLC Election 2022 | Maharashtra vidhan parishad election shiv sena and ncp have sufficient strength bjp congresss problem how to match the equation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra MLC Election-2022 | राज्यसभेनंतर आता महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचं (Maharashtra MLC Election-2022) बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आपआपल्या पक्षांनी चांगलीच खबरदारी घेतली असल्याचे दिसते. पक्षांनी आपल्या आमदारांना संपर्क करुन मुंबईत (Mumbai) येण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपला (BJP) साथ दिल्यानं आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) पक्षांची चांगली तारांबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका झाला आणि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. त्यामुळेच आता शिवसेनेने खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना फोन करुन मुंबईत बोलावले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना 18 जून रोजी सकाळी मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व आमदारांचा मुक्काम मुंबईतील रेनेसां हॉटेलमध्ये असणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. (Maharashtra MLC Election-2022)

 

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली
जोपर्यंत विधानपरिषदेची निवडणूक होत नाही तोपर्यंत या सर्वा आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार आहे. 18 तारखेला सर्व आमदार हॉटेलमध्ये येतील. त्यानंतर तेथे शिवसेनेचे नेते एक बैठक घेऊन सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्यासाठी फोन करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काँग्रेसने देखील सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याचे नियोजन केले आहे.

 

भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंनसमध्ये –
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. आताही मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे. भाजपने 5 वा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडे भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजप उमेदवार (BJP) –

– प्रवीण दरेकर (Praveen Darekar)

– राम शिंदे (Ram Shinde)

– श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya)

– उमा खापरे (Uma Khapare)

– प्रसाद लाड (Prasad Lad)

 

शिवसेना (Shivsena) –

– सचिन अहिर (Sachin Ahir)

– आमशा पाडवी (Amsha Padvi)

 

काँग्रेस (Congress) –

– चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore)

– भाई जगताप (Bhai Jagtap)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) –

– रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)

– एकनाथ खडसे (Eknath Khadse)

 

 

Web Title :- Maharashtra MLC Election-2022 | maharashtra mlc election 2022 bjp ncp shivsena congress party calls mla to reach mumbai

 

हे देखील वाचा :

Nilesh Rane On Supriya Sule | ‘नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण..’; टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला

Maharashtra SSC 10th Result 2022 | ठरलं ! दहावीचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर होणार

Pune Crime | सराईत गुन्हेगार हसन शेख खुन प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात मंगेश कदम पोलिसांसमोर ‘हजर’

 

Related Posts