IMPIMP

Nilesh Rane On Supriya Sule | ‘नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण..’; टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला

by nagesh
Nilesh Rane On Supriya Sule | bjp leader nilesh rane slams supriya sule over her comment on ajit pawar not allowed to give speech in dehu

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nilesh Rane On Supriya Sule | पुण्यातील देहूमध्ये संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. त्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषणाची संधी दिली नाही. यावरुन राज्यात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या भगिनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली. यावर भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. (Nilesh Rane On Supriya Sule)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

निशेल राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलायला संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचे कौतुक करणं त्यांना सुचलं नाही,” असा टोला निलेश राणेंनी ट्विटरवरुन लागवला आहे. त्याचबरोबर “खासदार सुळे टीव्हीवरील फुटेज बघा. हजारो वारकरी या कार्यक्रमाला आले होते. त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले,” असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

 

नेमकं प्रकरण काय आहे?
देहूमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.

 

सुत्रसंचालकाने थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे हात करत तुम्ही बोला असं सांगितलं.
मात्र अजित पवार यांनी आपण बोलावं अशी भूमिका घेत मोदींकडे पाहून भाषणासाठीच्या पोडियमकडे हात केला.
या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली.
हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nilesh Rane On Supriya Sule | bjp leader nilesh rane slams supriya sule over her comment on ajit pawar not allowed to give speech in dehu

 

हे देखील वाचा :

Maharashtra SSC 10th Result 2022 | ठरलं ! दहावीचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर होणार

Pune Crime | सराईत गुन्हेगार हसन शेख खुन प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात मंगेश कदम पोलिसांसमोर ‘हजर’

Rupali Chakankar | ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील Comment ची तक्रार करतो’; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र

 

Related Posts