IMPIMP

Pune Crime | सराईत गुन्हेगार हसन शेख खुन प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात मंगेश कदम पोलिसांसमोर ‘हजर’

by nagesh
Pune Crime | mk companys gang notorious criminal mangesh kadam surrendered the pune rural police haveli police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तीन वर्षापूर्वी सासवड पोलीस ठाण्याच्या (Saswad Police Station) हद्दीत धायरी (Dhayari) येथील सराईत गुन्हेगार हसन शेख (Criminal Hasan Sheikh) याचा खून (Murder) करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि एम. के. कंपनीचा (M.K. Company) म्होरक्या कुख्यात गुन्हेगार मंगेश उर्फ भाईजी कदम Mangesh alias Bhaiji Kadam (रा. नांदोशी, ता. हवेली) हा हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) शरण (Surrender) आला आहे. मंगेश कदम याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दहशत निर्माण करणे, बेकायदा जमाव जमविणे, खंडणी (Ransom) असे गंभीर गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु (Tegbir Singh Sandhu) यांनी आरोपीला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न (Pune Crime) केले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोपी मंगेश कदम आणि त्याच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. तेव्हापासून कदम फरार होता. हवेली, सासवड पोलीस ठाणे, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB), शहराची गुन्हे शाखा (Crime Branch), एटीएस पथक (ATS) यांच्याकडून कदम याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात होते. मात्र तो मोबाईलचा वापर करत नसल्याने आणि सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. (Pune Crime)

 

वडीलोपार्जीत जमीनीच्या वादातून मंगेश कदम याने खडकवासला येथील एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु यांनी कदमच्या संपर्कात असलेल्या हद्दीतील इतरांची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मंगेश याच्यावर दबाव वाढल्याने अखेर तो हवेली पोलिसांना शरण आला.

 

प्रभारी अधिकारी तेगबिरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम (API Nitin Nam),
पोलीस हवालदार दिनेश कोळेकर, निलेश राणे, विलास प्रधान, रामदास बाबर,
पोलीस नाईक राजेंद्र मुंढे व कॉन्स्टेबल स्वप्नाली कोलते यांच्या पथकाने रात्री उशिरा मंगेश कदम याला ताब्यात घेण्याची कारवाई केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | mk companys gang notorious criminal mangesh kadam surrendered the pune rural police haveli police station

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील Comment ची तक्रार करतो’; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र

Mumbai Crime | पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकाकडून 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार, दाऊद टोळीच्या नावाने महिलेला दिली धमकी

Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

 

Related Posts