IMPIMP

Maharashtra MLC Election | ‘भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | chandrakant patil targets rohit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Election | राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन (Maharashtra MLC Election) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आपलाच उमेदवार जिंकणार असा दावा भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडूनही (Mahavikas Aghadi) केला जातो आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“महाविकास आघाडीतील बेबनावाचा फायदा भाजपला होईल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. “अपक्षांना स्वत:चं मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असेही पाटील यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत देखील भाजपला 11 मतांची गरज होती. ती कशी मिळणार असा सवाल उपस्थित केले जात होते. पण ती मतं मिळाली, आमचा उमेदवार विजयी झाला.” (Maharashtra MLC Election)

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना बेबनाव थांबवता आला नाही, तर, संजय राऊत हे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर तुटून पडले आहेत. अपक्षांना स्वत: चं मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असं देखील पाटील म्हणाले. अडीच वर्ष अपक्षांनी साथ दिली मग ते चांगला आणि एका निवडणुकीत त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणं मतदान केलं असेल तर त्यांना बघून घेऊ असं म्हणंण चुकीचं असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra MLC Election | bjp leader chandrakant patil comment on vidhan parishad election 2022

 

हे देखील वाचा :

Modi Government | बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करावं लागणार

Central Government Agneepath Scheme | 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आणखी एक मोठा निर्णय

Pune Crime | वाघोली-चंदननगर परिसरात भर रस्त्यात 24 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग करुन अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

 

Related Posts