IMPIMP

Maharashtra Police | पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान; जाणून घ्या

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police | कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार, विविध आंदोलने, मोर्चे, 1 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण (Pune Rural Police) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Sr. Abhinav Deshmukh) यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 च्या अधिकारान्वये पोलीस अधिकाऱ्यांना अधिकारांचे प्रदान केले (Maharashtra Police) आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 6 नाव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

 

त्यानुसार रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने कोणत्या वेळात काढव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व वेळा निश्चित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना (Maharashtra Police) असतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

त्याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या,
कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे,
कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे,
शिंगे व इतर कर्कश्श वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे,
सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून
ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे,
सक्षम प्राधिकाऱ्यानी या अधिनियमांची कलमे क्र. 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे, हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Police | Empowering police officers under section 36; Find out

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Jayant Patil | समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले…

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

 

Related Posts