IMPIMP

Maharashtra Police | पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

by nagesh
Maharashtra Police | Maharashtra Dhule Police Training Center Food Poisoning SP Pravinkumar Patil

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police | शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी (Dhule Police Training Center) पोलिसांना शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच, 29 जणांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले (Food Poisoning). त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुणालाही काहीही अधिकचा त्रास नसल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (SP Pravinkumar Patil) यांनी दिली. (Maharashtra Police)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नव्याने पोलीस दलात येणाऱ्या पोलीस (Maharashtra Police) विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते. शुक्रवारी रात्रीचे जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास जाणवला नाही पण, क्षणार्धात एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या 29 प्रशिक्षणार्थींना उलट्याचा त्रास सुरू झाला. ही बाब गांभीर्याने घेत त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

 

 

Web Title : Maharashtra Police | Maharashtra Dhule Police Training Center Food Poisoning SP Pravinkumar Patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने गुंडांचा तरुणावर कोयत्याने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Ajit Pawar-Devendra Fadnavis | शरद पवार यांच्या घरावर हल्ला ! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘सेम’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Sharad Pawar | राजकारणात मतभेद, संघर्ष असतो परंतु टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

 

Related Posts