IMPIMP

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत ‘कही खुशी कही गम’, वित्त विभागाने घेतला मोठा निर्णय

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या (Public Transport) माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय केली होती. मात्र आता वित्त विभागाने (Finance Department) घेतलेल्या निर्णयामुळे पोलिसांचा निशुल्क प्रवास बंद झाला आहे. पोलिसांच्या (Maharashtra Police) प्रवासासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महिन्याच्या शेवटी 2700 रुपये प्रत्येकी तर अधिकाऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये वजा करुन ते सार्वजनिक वाहतुकीसाठी दिले जात होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या सुविधेमुळे पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक शासकीय गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करता येत होता. मात्र, यामुळे जे कर्मचारी आणि अधिकारी बेस्ट (BEST) किंवा परिवहन विभागाच्या बसने प्रवास करत नव्हते त्यांच्याही खात्यातून पैसे कापले जात असल्याने याचा फटका या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसत होता.

 

निशुल्क प्रवास बंद
आता वित्त विभागाने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार पोलिसांचा (Maharashtra Police) निशुल्क प्रवास बंद करण्यात आला आहे. ज्या पोलिसांना बसेस किंवा बेस्टचा वापर करायचा आहे. अशा पोलिसांनी तिकीट काढून प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून 2700 तर अधिकाऱ्यांऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये वजा केले जात होते ते आता कापले जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांना हा खूप मोठा दिलासा आहे.

 

बेस्टला सर्वात मोठा फटका
वित्त विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बेस्टला बसला आहे.
बेस्टला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वतीने महिन्याला एक लाख रुपये मिळत होते.
मात्र आता पोलिसांचा निशुल्क प्रवास बंद केल्याने बेस्टला हे पैसे मिळणार नाहीत.
त्यामुळे अगोदर तोट्यात असलेल्या बेस्टला आणखी फटका बसणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Police | now maharashtra police gets travel allowance TA News

 

हे देखील वाचा :

Mumbai Pune Vande Bharat Train | प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबई-पुणे प्रवास अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार

Jayant Patil On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या पत्रावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले – ‘राज्यातील घराघरापर्यंत पोहोचेल इतका मनसे पक्ष मोठा नाही’

DL Renewal | Driving Licence एक्सपायर झाले असेल तर करू नका चिंता, ‘या’ स्टेप्स फॉलो करून घरबसल्या करा आपले DL रिन्यू

 

Related Posts