IMPIMP

Maharashtra Political Crisis | कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग ! ठाकरे सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार?

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp to table no confidence motion against thackeray government movements continue after court decision

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) एक झटका बसला (Maharashtra Political Crisis) आहे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीत बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली होती. 12 जूलै पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यानंतर शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) भाजपा (BJP) अविश्वास ठराव मांडणार का? यावरून राजकीय घाडमोडींना प्रचंड वेग आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना 5 दिवसात उत्तर देण्यासाठी आदेश दिले आहेत. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 16 आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली आहे. 11 जुलैला पुढील सुनावणी होईपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. (Maharashtra Political Crisis)

 

यानंतर आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आलीय. आज सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडी विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तापेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, सरकार स्थापन करण्यातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाऊ शकते.
एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बंडासाठी ज्या हालचाली गेले दोन-अडीच महिने सुरू होत्या,
त्या हालचालींमध्ये शिवसेनेच्या ज्या २ आमदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
त्या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्यसंख्या 42 इतकी असल्याने शिंदे गटाला 16 मंत्रिपदे तर भाजपच्या वाट्याला 26 मंत्रिपदे येऊ शकतील.
अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bjp to table no confidence motion against thackeray government movements continue after court decision

 

हे देखील वाचा :

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

Shivajirao Adhalrao Patil | संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसलाय, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे वक्तव्य

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला सांगितले

 

Related Posts