IMPIMP

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

by nagesh
Shrikant Shinde On Sanjay Raut | my best wishes to sanjay raut on ed summons says thane mp shrikant eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shrikant Shinde On Sanjay Raut | एकीकडे राज्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला (Shivsena) आणखी धक्का बसला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. उद्या मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी (Patrachal Land Scam Case) राऊत यांना समन्स बजावले आहे. यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी (MP Shrikant Shinde) राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांचा गट अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई जिंकेल,” असं ते म्हणाले. दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या विधानामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, एप्रिलमध्ये ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि 2 सहकार्‍यांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती.
संजय राऊत यांना पाठवण्यात आलेल्या समन्सवर शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.
ईडीने भाजपाच्या भक्तीचे उदाहरण दिले आहे. त्यानुसार त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
असं शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
“मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान.. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत.
आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.
माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा!’ जय महाराष्ट्र! @Dev_Fadnavis, असं ट्विट करत त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केलं आहे.

 

Web Title :- Shrikant Shinde On Sanjay Raut | my best wishes to sanjay raut on ed summons says thane mp shrikant eknath shinde

 

हे देखील वाचा :

Shivajirao Adhalrao Patil | संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसलाय, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे वक्तव्य

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला सांगितले

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांना SC चा दिलासा ! उपाध्यक्ष झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला, जाणून घ्या कोर्टात काय झालं

 

Related Posts