IMPIMP

Habit Of Smartphones | जर तुम्हाला असेल वारंवार फोन पाहण्याची सवय तर व्हा सावध, ठरू शकते घातक!

by nagesh
Habit Of Smartphones | if you check your smartphone many times in a day it may be dangerous for health

सरकारसत्ता ऑनलाइन – स्मार्टफोन हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे (Habit Of Smartphones). स्मार्टफोनच्या माध्यमातून
एखादी व्यक्ती आपल्या कार्यालयातील अनेक कामे सहज करू शकते. स्मार्टफोन हा लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा अविभाज्य भाग
बनला आहे. या कारणामुळे लोक स्मार्टफोनला स्वतःपासून दूर करत नाहीत. वारंवार मेसेज, ईमेल इत्यादींसाठी फोन तपासत असतात. मात्र, वारंवार
मोबाईल वापरण्याची सवय (habit of repeatedly using mobile phones) घातक ठरू शकते. (Habit Of Smartphones)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तणावाचे ठरू शकते कारण (cause of stress)
फोन वारंवार पाहण्याची सवय माणसाचे आयुष्य कमी करू शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोन वारंवार पाहण्याच्या सवयीमुळे तणाव निर्माण होतो. अनेकदा टेन्शन हे फोनमधील मेसेजमुळे येते. सरासरी लोकांच्या स्मार्टफोनवर प्रत्येक 36 सेकंदाला कोणत्या ना कोणत्या मेसेजचे नोटीफिकेशन येते. त्यामुळे तणाव वाढतो.

 

कॉर्टिसोल हार्मोनचा स्राव (secretion of cortisol hormone)
तणाव आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक प्रकरणांमध्ये, असे दिसून आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा शरीर कॉर्टिसोल हार्मोन सोडते. या हार्मोनमुळे मानवी हृदय जलद गतीने पंप करू लागते. यामुळे शरीरातील शुगरची पातळीही वाढते. (Habit Of Smartphones)

 

होऊ शकतात हे आजार (These diseases can be)
अहवालानुसार, तणावामुळे केवळ व्यक्तीचे आयुष्य कमी होत नाही तर डायबिटिज, हार्ट अटॅक आणि डिप्रेशन यासारखे इतर अनेक आजार होऊ शकतात.
रिपोर्टनुसार, फोनचा विचार करताच आपली टेन्शन लेव्हल झपाट्याने वाढते. फोनच्या मेसेजवरून आलेले एखादे काम चुकणे,
वाईट मेसेज इत्यादी वाचून आपल्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. फोनच्या व्यसनामुळे हे टेन्शन हळूहळू वाढत जाते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Habit Of Smartphones | if you check your smartphone many times in a day it may be dangerous for health

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पैसे परत देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण, हाताची नखे उपटून काढण्याची दिली धमकी; हडपसर पोलिस ठाण्यात 4 जणांवर FIR

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एयरमध्ये (Akasa Air) फ्लाईट बुकिंग सुरू, पहिले उड्डाण 7 ऑगस्टला होणार

Pune Minor Girl Rape Case | इस्टाग्राम फ्रेंडकडून (Instagram Friend) 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

 

Related Posts