IMPIMP

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची न्यायालयात धाव

by nagesh
CM Eknath Shinde | shiv sainiks will not have to face false cases if this happens cm eknath shinde warns

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला आता निर्णायक वळण लागलं आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हटवून नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग (Maharashtra Political Crisis) आला आहे. सध्या सुरु असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. आपल्याकडे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा (Shivsena MLA) पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकार टिकवण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पक्षाकडून व्हिप जारी केल्यानंतरही हे आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडून या आमदारांना अपात्र (Vidhan Sabha Membership Canceled) ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून गुरुवारी 12 तर आज (शुक्रवार) चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांच्याकडे केली आहे. (Maharashtra Political Crisis)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे यांना आऊट करण्याचा प्लॅन शरद पवारांचा आहे. शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन आहे.

महाविकास आघाडीचा प्लॅन उधळून लावण्यासाठी शिंदे गटाने देखील तयारी केली आहे. शिंदे गटाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढील घडामोडीचे केंद्र विधानसभेप्रमाणे मुंबई हायकोर्ट असणार आहे. शिंदे गटानं यापूर्वीच शिवसेनेच्या मागणीनंतरही समर्थक आमदार अपात्र होणार नाहीत, असा दावा केला आहे. हाच दावा शिंदे गटाने कोर्टात मांडला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आमच्याकडे 40 शिवसेना आमदार आणि 12 अपक्ष आमदार आहेत.
अशा अल्पमतात असताना गटनेता बदलता येत नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतच्या प्रकरणावर बोलताना शिंदे म्हणाले, बैठकीला हजर नाही म्हणून एखाद्याला अपात्र ठरवणं हे हास्यास्पद आणि बेकायदेशीर आहे.
याचा कोणताही परिणाम आमदारांवर होणार नाही, असा दावा शिंदे गटाने केला आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde group reach in mumbai bombay high court maharashtra political crises

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी साहित्य पुन्हा चोरीला

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच जिंकणार’; संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

Maharashtra Political Crisis | ‘या’ 4 जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

Related Posts