IMPIMP

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

by nagesh
Maharashtra Political News | sanjay raut spread fake news about ajit pawar allege chandrashekhar bawankule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या
बातम्या प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: माध्यांशी संवाद साधून या
बातम्यांमध्ये तथ्य नसून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार काय असं म्हणत अजित
पवार यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) सुनावलं होतं. यानंतर अजित पवारांबाबतच्या बातम्या संजय राऊतांनीच (Maharashtra Political
News) पसरवल्याचाही आरोप होत आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुरुवात तर संजय राऊतांनीच केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत शरद पवारांना (Sharad Pawar) जाऊन भेटले, त्यानंतर या बातम्यांना पेव फुटला. त्यामुळे अजित पवारांनी स्पष्ट केलं की, सुरुवात कुणी केली. त्यामुळे संजय राऊत पवारांचं ऐकतात की आणखी कुणाचं ऐकतात याबद्दल मला काही बोलायचं नाही.

 

बावनकुळे पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांचं प्रतिमा हनन (Maharashtra Political News) करुन त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याला दुसरे कुणी जबाबदार नाहीत. महाविकास आघाडीतूनच असे प्रयत्न सुरु असतील, असा आरोप त्यांनी केला.

 

पक्षफुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना (NCP MLA) फोन केल्याची चर्चा आहे, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मी कालही स्पष्ट केलं आहे की, भाजपकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या नेतृत्वावर वारंवार कोण प्रश्न उपस्थित करत आहे हे त्यांनीच तपासलं पाहिजे.

 

बावनकुळे पुढे म्हणाले, आमच्याकडून अशी कोणतीही चर्चा झाली नसून मी त्यांच्या प्रतिमेला धक्का लागेल अथवा जी गोष्ट घडलीच नाही त्यासंदर्भात चुकीची माहिती देणार नाही. कुणीच अशी चुकीची माहिती देऊ नये. अजित पवारांनी भाजपाशी कोणताही संपर्क केला नाही. तसेच भाजप त्यांच्या संपर्कात नाही. कपोकल्पित बातम्या तयार केल्या जात असून या बातम्या अजित पवारांचे विरोधक तयार करत असतील, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Political News | sanjay raut spread fake news about ajit pawar allege chandrashekhar bawankule

 

हे देखील वाचा :

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाला विजेतेपद !!

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Chandrashekhar Bawankule | ‘तावडे समितीचा अहवाल खरा आहे का?’ बावनकुळे म्हणाले -‘भाजपात अशी कोणतीही…’

 

Related Posts