IMPIMP

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या मंत्र्याची खोक्यांच्या विषयावर स्पष्ट कबुली, म्हणाले – ‘हम तो है बदनाम, बदनामी हम से डरती है’

by nagesh
Maharashtra Politics | gulabrao patil speech in jalgaon criticized those who accused eknath shinde mla of taking boxes

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत. ‘लेकीन बदनाम वो होते है जो बदनामी से डरते है हम तो व बदनाम है बदनामी हमसे डरती है’, अशी स्पष्ट कबुली शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात एका जाहीर कार्यक्रमात भाषण करताना दिली. आमदार पैसे घेऊन गुवाहटी गेले, असा आरोप करणारे अमरावतीचे आमदार रवि राणा (MLA Ravi Rana) यांच्यावर तोफ डागताना गुलाबराव म्हणाले, तीन-चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधून इकडे आलेले लोक आमच्यावर टीका करत आहेत. तू सिद्ध करून दाखव कुठे झाले आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पाण्यामध्ये राजकारण न करता काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी, मनसे (MNS), शिवसेना (Shivsena) व उद्धव ठाकरेवाले (Uddhav Thackeray) सर्वांनी पाणी प्या आणि मैदानात या. पाण्यात जात, धर्म, पंथ पाहायचा नसतो हे कोरोना काळात सर्वांनी अनुभवले आहे. मात्र कोरोना काळात माणसांची एकजूट पाहायला मिळाली.

 

सध्याच्या राजकीय स्थितीवर गुलाबराव पाटील म्हणाले, पाण्याच्या कामात इमानदारी पाहिजे. मात्र आजच्या काळात प्राथमिक शिक्षक व मिल्ट्री मधला माणूस हेच इमानदार आहेत बाकी माझ्यासह कुणीही इमानदार नसून सद्यस्थितीत शिट्टी मारली की पैसे, आजा मेरी गाडी मे बैठ जा… अशी परिस्थिती आहे. (Maharashtra Politics)

 

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मी गावरान माणूस असून दादा कोंडकेचा पिक्चर पाहणारा माणूस आहे. त्यामुळे डबल अर्थी बोलणारच तसे नाही बोललो तर मंत्र म्हणण्यासारखे होईल. योगायोगाने चुकून या धंद्यात आलो मी कीर्तनकार असतो तर यापेक्षाही मोठी गर्दी झाली असती. पण बाळासाहेबांच्या कृपेने आपले दुकान बरे चालले आहे.

 

विरोधकांना इशारा देताना पाटील म्हणाले, पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा राजा व्हायचा.
मात्र आता राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही, तर राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो,
त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. पन्नास हजार मतांनी आम्ही निवडून आलेलो आहोत.
म्हणून तर कोणी ऐरे गैरे नथ्थू खैरे आम्हाला पाडून टाकू असे बोलत आहेत.
मात्र शंभर दिवस हिजड्यासारखे जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखा जगा हेच शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-Maharashtra Politics | gulabrao patil speech in jalgaon criticized those who accused eknath shinde mla of taking boxes

 

हे देखील वाचा :

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडने ओलांडली असेल बॉर्डर लाईन तर आजच ‘हे’ 5 फूड्स टाळा, अन्यथा वाढू शकते सांधेदुखी

Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना केले चॅलेंज, म्हणाले – ‘मी राजीनामा देण्यासाठी तयार, पण…’

Chickenpox in Children | जाणून घ्या मुलांना चिकनपॉक्स झाल्यास काय करावे आणि काय करू नये?

Jalgaon ACB Trap | क्राईम मिटींगला येण्याच्या तयारीत असलेले 2 पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, संपुर्ण जिल्ह्यात खळबळ

 

Related Posts