IMPIMP

Maharashtra Politics News | ‘आपण जातीवंत पाटील, पत्रावळ्या फेकाव्या तशी पावणे दोनशे एकराचे सातबारे फेकले, 50 खोकं घेऊन कुठं बसतुय’

by nagesh
Maharashtra Politics News | ajit pawar tells uddhav thackeray this is the son of patla a casteist shahaji bapu patil

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन –  Maharashtra Politics News | शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती करुन सरकार (Maharashtra Politics News) स्थापन केले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोप केला. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या नेत्यांना इशारा दिला आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे 45 वर्ष माझे पालक होते. मात्र त्यांच्याजवळ गेलेल्या लहान पक्षांना त्यांनीच संपवलं, असा आरोप शहाजीबापूंनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने 50 खोके, एकदम ओक्के असं म्हणत टीका केली जात आहे. मविआच्या प्रत्येक सभेत गद्दार आणि 50 खोके म्हणत शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे शिंदे गटाकडूनही पलटवार (Maharashtra Politics News) करण्यात येतो. आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि 50 खोक्के म्हणून चिडवणाऱ्यांना आपण जातीवंत पाटील असल्याचं सांगितलं. तुमच्या पुढच्या पिढीची सोय करायचीय म्हणून ते तुम्हालाच लखलाभ, असं पाटील यांनी म्हटलं.

 

शहाजीबापू पुढे म्हणाले, ही पाटलाची औलाद आहे, जातीवंत आहे, पावणे दोनशे एकर जमीन अशी पत्रावळी
फेकाव्यात तशी मी सातबारे फेकले आहेत, 50 खोकं घेऊन कुठं बसतुय,
असे म्हणत 50 खोक्क्यांवरुन चिडवणाऱ्यांना चांगलचं फटकारलं आहे. तसेच शहाजी पाटील ही कर्णाची औलाद आहे,
घरात घेऊन जाणारा नव्हं. तुम्ही साचवून ठेवा नातवासाठी, तुमचं नासून जाणार.
आमचा खळखळणारा झरा, आलं इकडं, गेलं तिकडं, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | ajit pawar tells uddhav thackeray this is the son of patla a casteist shahaji bapu patil

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘… तर मी विरोध करणारच’, बाजार समित्यांच्या मुद्यावरुन अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये खडाजंगी

Sanjay Dutt Injured | शुटिंग दरम्यान जखमी झाल्याने संजय दत्त रूग्णालयात दाखल

Pune Crime News | पुण्यात रेशनिंगवरील धान्याचा काळाबजार ! खडक पोलिसांकडून भवानी पेठेतील तिघांना, 2700 किलो तांदळाचा टेम्पा निघाला होता दौंड तालुक्यात

 

Related Posts