IMPIMP

Maharashtra Politics News | ‘अजितदादांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट नाही’, भाजप आमदाराचे मोठं विधान

by nagesh
Maharashtra Politics News | bjp secretary mla shrikant bharatiya statement goes viral about ajit pawar

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच इकडे आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) आले नाहीत. त्यांच्या पक्षाने सरकारला पाठिंबा दिला आहे. सिंचन घोटाळ्यातून (Irrigation Scam) अजित पवार यांना कोणतीही क्लीन चीट देण्यात (Maharashtra Politics News) आली नाही. त्यासंदर्भात चौकशी सुरु असल्याचे भाजप सचिव, विधानसभा आमदार श्रीकांत भारतीय (MLA Shrikant Bhartiya) यांनी सांगितलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

श्रीकांत भारतीय पुढे म्हणाले, अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित हेच ध्येय होते. निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा असेल तर तो निर्णय जनता स्वीकारते. अजित पवार यांनी जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असं दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचं ठरतं. (Maharashtra Politics News)

सरकारने 2014 ते 2019 या पाच वर्षात केलेल्या कामागिरीवर जनतेने निवडणुकीत भाजपला कौल दिला आहे.
2019 ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्वाचे सरकार नव्हते.
त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले, असे श्रीकांत भारतीय म्हणाले.

Web Title : Maharashtra Politics News | bjp secretary mla shrikant bharatiya statement goes viral about ajit pawar

Related Posts