IMPIMP

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रस्सीखेच, पाच नावांची चर्चा; ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची भुजबळांची मागणी

by nagesh
Maharashtra Politics News | ncp maharashtra president race jayant patil ajit pawar chagan bhujabal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदावर पाहिजे तसं काम करत नसल्याची चर्चा अनेक नेत्याकडून ऐकायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते (Opposition Leader) पद सोडण्याची माझी तयारी आहे. मला संघटनामध्ये कोणतीही जबाबदारी घ्यावी अशी मागणी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत केली होती. (Maharashtra Politics News) राष्ट्रवादीच्या (NCP) 25 व्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदावर रस नाही. एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष कोण होणार यावर सध्या पक्षात घमासान पाहायला मिळत आहे.

एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांना बदलवून काँग्रेस (Congress) पक्षाच्या फॉम्युला अनुसार अध्यक्ष व्हायला पाहिजे अशी भूमिका एनसीपी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. (Maharashtra Politics News) विरोधी पक्षनेता मराठा असेल तर प्रदेश अध्यक्ष ओबीसी (OBC) असला पाहिजे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी थेट ओबीसी नेत्यांची नावे सांगितली.

ओबीसीमध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), धनंजय मुंडे (Dhananjay Munde),
सुनील तटकरे (Sunil Tatkare), आणि शेवटी अनुभवी अध्यक्ष हवा असेल तर स्वत: भुजबळ तयार आहे असे
मत व्यक्त केले. भुजबळ यांनी भाजप (BJP)
काँग्रेस पक्षात ओबीसी नेते असल्याचा दाखला त्यांनी दिला. जयंत पाटील
यांनी 5 वर्ष 1 महिना अध्यक्ष पद सांभाळत आहे, तर मला 4 महिनेच अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली होती,
मला जबाबदारी दिली तर मी स्वीकारेल असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Maharashtra Politics News | ncp maharashtra president race jayant patil ajit pawar chagan bhujabal

Related Posts