IMPIMP

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Politics News | nitesh rane criticize sanjay raut comparing with gautami patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणेंनी संजय राऊत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) गौतमी पाटील (Gautami Patil) असल्याचं म्हणत जहरी टीका (Maharashtra Politics News) केली आहे. तसेच राऊतांना ते नेमके कुणाच्या बाजूने आहेत हेही माहिती नसल्यामुळे सरड्याला पण लाज वाटेल इतक्या वेळा ते रंग बदलतात, असा हल्लाबोल केला. ते शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत रंग बदलणारा सरडा आहे. ते उरलेली शिवसेनाही (Shivsena) संपवतील. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत. गौतमी जशी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, ती एक उत्तम कलाकार आहे. शिवाय लोकांमध्ये लोकप्रिय आहे. गौतमी पाटील मनोरंजन करत असल्याने लोकांना बघायला आवडतं. पण गौतमीसारखं राऊत रोज सकाळी येऊन लोकांच मनोरंजन करतात. कोणाचीतरी सुपारी घेवून नुसतं आग लावण्याचं काम ते करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे, असे राणे म्हणाले.

 

मी गौतमी पाटीलला विनंती करेल की, तिने तिचे मेकअपचं काही सामान असेल तर ते संजय राऊतांकडे पाठवावं. गौतमीने राऊतांचं थोबड थोड चांगलं करावं. रोज सकाळी येऊन नशेत असल्यासारखं बोलत असतात. लोकांची सकाळ खराब करतात. ते इतरांची सुपारी घेऊन आग लावण्याचं, काड्या करण्याचं काम करतात, असा आरोप नितेश राणे यांनी राऊतांवर केला.

 

 

राणे पुढे म्हणाले, राऊतांचं आज सकाळी गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यावर प्रेम ओतू येत होतं.
जेव्हा तुमच्याकडे आमदार-खासदार होते. तेव्हा तुमचे मालक (उद्धव ठाकरे) या आमदार-खासदारांचा किती
वेळा अपमान करत होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तासन् तास गजानन कीर्तिकर,
दिवाकर रावते (Diwakar Raote) यासारखे अनेक नेते वर्षावर बसू राहयचे. परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांना वेळ देत नव्हते. मविआच्या काळात अजित पवार (Ajit Pawar) सर्वात कमी निधी शिवसेनेच्या आमदारांना द्यायचे, असाही आरोप राणे यांनी यावेळी केला.

 

भाजपसोबत (BJP) युती असताना शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि ठाकरेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) खूप मान-सन्मान देत होते. जेवळे त्यांचे भाऊ देणार नाहीत,
तेवढा मान हे फडणवीस ठाकरे कुटुंबियांना द्यायचे. म्हणून तर ठाकरे ट्रस्टवर स्मारक बनतंय.
या सर्व परवानग्या फडणवीसांनीच मिळवून दिल्या, असंही नितेश राणे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | nitesh rane criticize sanjay raut comparing with gautami patil

 

हे देखील वाचा :

Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक मार्गावर भीषण अपघात, 10 मेंढ्या जागीच ठार

Pune News | हौशी बैलगाडा मालकाने घोडीला आणले महागड्या फॉर्च्युनर कारमधून; व्हिडीओ तुफान व्हायरल

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप

 

Related Posts